श्रीवर्धन  

कोरोना साथीत लॉकडाऊनमुळे नोकरी,रोजगार गेलेली चाकरमानी आता शेतीच्या कामाला लागल्याचे आशादायी चित्र दिसू लागले आहे.

लॉकडाउनमुळे रोजगार, नोकरी,व्यवसायकरिता मुंबई ,पुणे व इतर अन्य शहरांमधून अनेक कुटुंब तरुण मंडळी आपआपल्या गावी परतली आहेत. मोठ्या प्रमाणात शहरांमधून ही मंडळी गावाकडे स्थलांतरित झाली आहेत. गेल्या महिन्याभरात श्रीवर्धन तालुक्यातील अनेक भागात शहरातून तरुण मंडळी लॉकडाउनमुळे शहरांमध्ये नोकरी व्यवसाय ठप्प झाल्याने व त्यामुळे उपजिविकेचा प्रश्‍न निर्माण झाल्याने आपल्या मूळ गावाकडे आले आहेत. दिवसेंदिवस बिकट होणारी परीस्थिती व शहरातील भितीदायक वातावरण यामुळे कित्येक वर्षे आपल्या शेतीमध्ये पाय न ठेवणारी हि मंडळी आता शेती हिच आपली उपजिवीका याची जाणिव झाल्याने शेतीकामाला हातभार लावण्यात व्यस्त झाल्याचे समाधानकारक चित्र ग्रामीण भागात दिसत आहे.

 गावामध्ये दाखल झालेले हे तरुण गावातील आपल्या कुटुंबाला शेतीच्या कामात मदत करीत आहेत. शेतीच्या कामासाठी सध्या हेच तरुण आपल्या कुटुंबासाठी आधार ठरत आहेत.नोकरीसाठी आपले गाव सोडुन स्थलांतरीत होणार्‍या या तरुण मंडळीनी शेती व्यसायात मेहनत करुन शेतीचे अर्थशास्त्र समाजुन घेतले तर आपले शेत शिवार सुजलम् सुफलम् व्हायला वेळ लागणार नाही आता गरज आहे