गोवे-कोलाड 

रोहा तालुक्यातील भातशेतीची कामे पावसामुळे रखडली असून पाऊस खोळंबला असल्याने शेतकर्‍यांची चिंता प्रचंड वाढली असल्याचे दिसून येत आहे.

शेतकर्‍यांचे गेली तीन चार महिने कोरोना लॉक डाऊन टाळेबंदीत आधीच आर्थिक नुकसान झाले आहे.त्यांची हातकमाईचे साधनच हरपून गेले त्यात 3 जून रोजी झालेले निसर्ग चक्रवादळात अनेकांची घरे उध्वस्त झाली.कुटूंब रस्त्यावर आली ते कसेबसे सावरत काहीही हातात नसताना हजारांची  हात उसनकी करत भात शेतीला लागणारे बियाणे आणून वेळेवर पेरणी केली.बळीराजा कधीही हार पत्करत नाही हे कोरोनाला दाखवून दिले.मात्र निसर्गापुढे कोणाचे चाले ना गेली आठवडा भर पावसाचा खोळंबा झाल्याने भात शेती लागवडीची कामे रखडली उगवलेले रोपे  पाण्याअभावी सुकून जात असल्याने बळीराजा आणखी आर्थिक संकटात सापडला असल्याने समोरील संकटाला तोंड द्यावे लागत आहे.

कोरोना संकटाच्या पार्श्‍वभूमीवर राज्यसरकारने शेतकर्‍यांना दिलेल्या आश्‍वासनाप्रमाणे भात शेतीला लागणारे बियाणे व रासायनिक खते ही वेळेवर बाजारात उपलब्ध करून दिल्याने कोणताही विलंब न लावता शेतकर्‍यांनी बियाणे खरेदी करत भात पेरणी केली त्यामुळे वेळेवर भात पेरणी झाल्याने ती आता वीस ते पंचिविस दिवसात लागवडीकरता आली मात्र अचानक पावसाने दडी मारल्याने शेतकर्‍यांच्या तोंडचं पाणीच पळाले पुन्हा मोठे संकट डोळ्यासमोर उभे होतो की काय पेरलेले बियाणे उगवले खरे मात्र पाणी अभावी ते सुकण्याच्या मार्गावर आहेत. पावसाने दडी मारल्याने रोपांची लागवड करता येत नाही त्यामुळे  बळीराज्याची चिंता वाढली असल्याचे दिसून येत आहे.

यावर्षी पावसाने वेळेवर हजेरी लावत चांगली सुरवात केली त्यामुळे तालुक्यातील खांब देवकान्हे धामणसई विभागात कालव्याला पाणी येत नसल्याने येथील बहुतांश शेतकरी हे पावसाळ्यातील एकपिक घेतात शेकडो हेकटवर भात शेतीची लागवड केली जाते मात्र पावसाच्या खोळंब्यामुळे भात शेती लागवडीची कामे रखडली आहेत जमिनीला कोरड पडल्याने रोपे  सुकण्याच्या मार्गावर आहेत तसेच एक दोन दिवसात पाऊस पडला नाही तर अनेक शेतकर्‍याचे  पीक वाया जाण्याच्या मार्गावर असून ते अधिक आर्थिक संकटात सापडनार असल्याचे दिसून येत आहे.