म्हसळा 

म्हसळयातील बळीराजा निर्सग वादळाच्या नुकसानीतून सावरत असतानाच भात रोपे आवण लावणी योग्य झाल्यामुळे पाणथळ भागातील शेतकरीवर्ग लावणीत गुंतला आहे.

तालुक्यात आजपर्यत 552 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. तालुक्यात 2400 हेक्टर क्षेत्रांत भाताचे पिक घेतले जाते. 240 हेक्टर क्षेत्रांत भात आवण तयार केल्याचे सांगण्यात आले. बहुतांश शेतकर्‍यांनी रुपाली, जोरदार, रुचिका, अस्मिता, ज्योतिका, वैष्णवी, साईराम, साई, श्रीराम या सुधारीत, सुर्वणा लोकल वाण, लोकनाथ 505 संकरीत बियाण्याची लागवड केली आहे. तालुक्यांत बहुतांश भागात नांगरणी नंतर चिखलणी करून या क्षेत्रात लावणी केली जाते. भात रोपांची काढणी झाल्यानंतर पुनर्लागवड हा महत्त्वाचा टप्पा असतो.

दरम्यान,निर्सगचक्री वादळांत प्रंचड प्रमाणांत घरे, फळबागायतींचे नुकसान होऊनही लावणीसाठी चिखलांत उतरलेला कोकणी शेतकरी चाकरमानी ङ्गअनलॉक-2फ चे स्वागतासाठी आनंदाने लावणीत गुंतला आहे.