जेएनपीटी

उरण तालुक्यात सध्या पावसाने पाठ फिरवल्याने भाताची रोपे पाण्या अभावी करपू लागली आहेत.त्यामूळे शेतकरी हवालदिल झाला असून त्याच्या नजरा या आभाळाकडे लागलेल्या आहेत.

जूनच्या पहिल्या आठवड्यात पावसाने दमदार हजेरी लावली होती.त्यामूळे शेतकर्‍यांनी भात बियाणे यांची पेरणीची कामे आप आपल्या शेतात उरकून घेतली.परंतू भाताची रोपे वाढू लागली असताना पावसाने हुलकावणी दिली.आज गेली आठ दिवस पाऊस गायब झाल्याने वाढत्या उन्हामुळे लागवडीसाठी येणारी भाताची रोपे पावसाच्या पाण्या अभावी करपून जातात की काय या भितीने शेतकरी हवालदिल झाला आहे.