Tuesday, April 13, 2021 | 12:34 PM

संपादकीय

विज्ञान शिक्षणासाठी मराठी विद्यापीठ!

मराठी राजभाषा दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिन

जागतिक विक्रमासाठी अलिबाग मधील तीन बालवैज्ञानिकांची निवड
रायगड
23-Jan-2021 12:55 AM

रायगड

अलिबागकरांसाठी मानाची गोष्ट 

अलिबाग | भारत रांजणकर

डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम इंटरनेशनल फाउंडेशन आणि स्पेस झोन इंडिया अंतर्गत एकूण शंभर उपग्रह तयार करण्यात आले असून सात फेब्रुवारीला जागतिक विक्रम करण्यासाठी रामेश्वरम (तामिळनाडू )येथे जय्यत तयारी सुरू झाली आहे. या उपक्रमासाठी रायगड जिल्ह्यातील एकूण चार त्यामध्ये अलिबाग तालुक्यातील तीन बाल वैज्ञानिकांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये अवधूत संदीप वारगे 9वी, आरसीएफ सेकंडरी स्कूल कुरूळ-अलिबाग, स्वरा अविनाश पाटील 7वी व केशवी संजय सावंत 8वी या दोन्ही विद्यार्थिनी चिंतामणराव केळकर विद्यालय अलिबाग यांचा समावेश आहे.

   या अंतराळ मोहिमेसाठी देशभरातील 1000 विद्यार्थी सहभागी झाले आहेत.

शालेय जीवनातच स्पेस टेक्नॉलॉजी जिज्ञासा निर्माण होऊन भविष्यात स्पेस टेक्नॉलॉजीमध्ये नक्कीच आपले योगदान देतील.यासाठी खास महाराष्ट्रातील मुलांसाठी मराठीमधून प्रशिक्षण देण्यात आले. यासाठी ऑनलाईन आठ व प्रत्यक्ष पुणे येथे कार्यशाळा घेण्यात आल्या आहेत. 

7 फेब्रुवारी 2021 रोजी रामेश्वरम (तामिळनाडू) येथून या उपग्रहांचे प्रक्षेपण करण्यात येणार आहे.त्यामुळे पुढील जागतिक विक्रमांची नोंद होणार आहे.

१) गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड 

२) भारतीय बुक रेकॉर्ड 

3) एशियन बुक ऑफ रेकॉर्ड

4) वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड 

5) असिस्ट वर्ल्ड रेकॉर्ड्स 

वरील पाचही प्रमाणपत्र सहभागी विद्यार्थ्यांना वैयक्तिक रित्या मिळणार आहेत.अशी माहिती फाउंडेशनचे सचिव श्री मिलिंद चौधरी सर यांनी दिली आहे.

१०० पेलोड उपग्रह बनवून हेलियम बलून द्वारे अवकाशात नेणार आहेत. व नियोजित कालावधीत पुन्हा पृथ्वीवर उतरवणार आहेत. 

यामोहिमेमुळे स्पेस रिसर्च पेलोड क्यूब्ज प्रकारचा उपग्रह म्हणजे काय. त्याचे विविध भाग कुठले? त्यांचे कार्य कसे चालते? हेलियम बलून म्हणजे काय? या प्रकारचे उपग्रहाचे बाहेरील कवच कुठल्या वस्तूंचा वापर करून बनवितात? या उपग्रहात अभ्यासासाठी कुठले सेंसर असतात? कुठले सॉफ्टवेअर वापरायचे? अशी सर्व माहिती शालेय विद्यार्थ्यांना मराठी मधूनच दिलीआहे. जगात सर्वात कमी वजनाचे (२५ ग्रॅम ते ८० ग्रॅम )१०० उपग्रह बनवून आणि त्यांना ३५००० ते ३८००० मीटर उंचीवर हाय अल्टीट्युड सायन्टिफिक बलून द्वारे प्रस्थापित केले जातील. उपग्रह एका केस मध्ये फिट केलेले असतील . या केस सोबत पॅराशूट, जीपीएस ट्रॅकिंग सिस्टिम, लाईव्ह कॅमेरा जोडलेला असेल.  तेथून प्रत्यक्ष ओझोन, कार्बनडायॉक्सिडं हवेची शुद्धता, हवेतील प्रदूषण, हवेचा दाब आणि इतर  माहिती हे उपग्रह पृथ्वीवरील केंद्राला पाठवतील. या पेलोड सोबत काही झाडांच्या बीज सुद्धा पाठवण्यात येत आहे. या मुळे कृषी विभागास अवकाशातील शेती करण्याच्या संशोधनास मदत मिळेल.

 ह्या मोहिमेमुळे विद्यार्थ्यांमध्ये स्पेस संबधी संशोधनाची आवड निर्माण होऊन भविष्यात त्यांना करियर बनविताना नक्की उपयुक्त ठरेल. हा उपक्रम कलाम कुटुंबियांद्वारे रामेश्वरम येथून राबविला जात असून महाराष्ट्रामध्ये मनिषा चौधरी  महाराष्ट्र राज्य समन्वयक, डॉ. एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाऊंडेशन यांचे नेतृत्वात यशस्वी होत आहे.

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top