Tuesday, April 13, 2021 | 01:49 PM

संपादकीय

विज्ञान शिक्षणासाठी मराठी विद्यापीठ!

मराठी राजभाषा दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिन

शेकापक्ष नाभिक समाजाच्या पाठिशी-चित्रलेखा पाटील
रायगड
02-Jan-2021 05:39 PM

रायगड

। अलिबाग । शहर प्रतिनिधी ।

नाभिक समाजाच्या व्यवसायाकडे कला म्हणून पाहताना बॉलीवूड पासून ते गल्लीतल्या दुकानांपर्यंत हा सगळ्यांसाठी एक असा महत्वाचा भाग आहे. शेतकरी कामगार पक्ष हा प्रत्येक तळागाळातल्या समाजासाठी काम करणारा पक्ष आहे. नाभिक समाजाच्या पाठिशी शेकापक्ष तसेच आमदार जयंत पाटील नेहमीच पाठीशी असतील असे प्रतिपादन शेकाप महिला आघाडीप्रमुख नगरसेविका चित्रलेखा पाटील यांनी केले. यावेळी समाजबांधवानी 35 रक्तपिशव्यांचे संकलन करुन जिल्हा रक्तपेढीला सहकार्य केले.

हुतात्मा विर भाई कोतवाल यांच्या हुतात्म्या दिना निमित्त अलिबाग तालुक्यातील श्री संत सेना महाराज नाभिक समाज संस्थानी दिनदर्शिका प्रकाशन सोहळा व रक्तदान शिबिराचे आयोजन केले. या वेळी प्रमुख पाहुण्या म्हणून चित्रलेखा पाटील मार्गदर्शन करीत होत्या. शेखर घाडगे यांच्या अध्यक्षतेखाली या कार्यक्रमाला डॉ. प्रशांत शिंदे, नगरसेवीका सुरक्षा शाह, जिल्हा अध्यक्ष दिनेश मोरे, नायब तहसिलदार अजित टोळकर, जिल्हा विश्‍वस्त दिलीप टक्के, तालुका अध्यक्ष वैभव कदम, जिल्हा रक्त पेढीचे रक्तसंक्रमण अधिकारी डॉ दिपक गोसावी आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

यावेळी समाजाला संबोधित करताना चित्रलेखा पाटील यांनी नाभिक समाजाचे कौतुक केले. त्या पुढे म्हणाल्या, 2020 वर्षात नाभिक समाजाला मोठया कठिण परिस्थितीला सामोरे जावे लागले. तरी देखील शासनाला सहकार्य करण्यासाठी त्यांनी आज रक्तदान शिबीराचे आयोजन करुन आपल्यातील मोठेपणा जगासमोर आणला आहे. शहरातील एका चौकाला हुतात्मा विर भाई कोतवाल यांचे नाव देण्याच्या मागणीवर बोलतना त्यांनी याबाबत जयंत पाटील तसेच नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांच्यासमोर याबाबत प्रस्ताव ठेवून चर्चा करुन निर्णय घेण्याचे आश्‍वासनही त्यांनी यावेळी दिले. अदाणी अंबानींमुळे छोटे व्यवसायाचे नुकसान झाले आणि आता ते सलुनचे पण कॉर्पोरेटेशन करतील. काय खायचे, काय बोलायचं हेही ते आपल्याला सांगतील, उदया केस कुठे कापायचे हे पण तेच आपल्याला सांगतिल अशी भीती त्यांनी यावेळी व्यक्त केली. मात्र आ. जयंत पाटील अशा वेळी खर्‍या अर्थानी तुमच्या पाठीशी उभे राहतील असा विश्‍वास व्यक्त करतानाच त्यांनी अशी मोठी साखळी आपल्याकडे नाही तर आपल्याच एखाद्या सुपुत्रांनी चार साखळी काढून मुंबईला नेली पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

जिल्हा अध्यक्ष दिनेश मोरे यांनी आपल्या भाषणात प्रस्ताव मांडला वीर भाई कोतवाल यांच्या पुण्यतिथी दिवशी जिल्ह्यातील सर्व दुकाने बंद असली पाहिजेत. प्रत्येक जिल्हा परिषद शाळांमध्ये त्यांच्या प्रतिमा लावाव्यात यासाठी आपण जिल्हा परिषदेला निवेदन दिले असून त्यासाठी पाठपुरावाही करत असल्याचे सांगितले. प्रस्ताविक वैभव मुकादम यांनी केले.

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top