Tuesday, January 26, 2021 | 09:17 PM

संपादकीय

लोकशाहीचा आत्मा जपावा

भारतीय लोकशाहीच्या दृष्टीने तीन तारखा अत्यंत महत्त्वाच्या आहेत

ट्रम्पशाहीचे वास्तव
रायगड
10-Jan-2021 04:58 PM

रायगड

अमेरिकेचे मावळते अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांनी सत्ता सोडत असताना अमेरिकेच्या सर्वोच्च प्रतिनिधीगृहावर हल्ला करण्याचा जो उद्दामपणा केला त्यावरुन ट्रम्पशाहीचे वास्तव उघड झाले आहे. जागतिक पोलिसाच्या नेहमीच भूमिकेत असलेल्य अमेरिकेला आपल्याच देशातील लोकशाही वाचविण्याची नामुष्की या निमित्ताने आली. ट्रम्प हे नेहमीच वादाचा गर्तेत त्यांच्या चार वर्षाच्या अध्यक्षपदाच्या कालखंडात राहिले आहेत. त्यांनी विविध प्रश्‍नांच्या वेळी केलेली विधाने ही अध्यक्षपदास शोभणारी नव्हती. सुरुवातीला तर ते आपला पराभव झालेला आहे ते वास्तव मानावयासच तयार नव्हते. त्याबद्दल त्यांच्यावर अनेकांनी टीका केली होती. अमेरिकन लोकशाहीस हे सर्व नवीनच होते. सत्ता सोडतानाही त्यांनी अतिरेकी भाषा केली. अखेरीस न्यायालयाने त्यांचे दरवाजे बंद केल्यावर त्यांना पराभव मान्य करावा लागला होता. त्यांनी सत्तांतराच्या निम्तिताने केलेले भाषण हे चिथवणारे होते. त्यांच्या सर्वोच्च प्रतिनिधीगृहांच्या परिसरात नुसती बेदिली माजली नाही, तर एका पोलिस अधिकार्‍यासहित पाच जण मारले गेले आहेत. वॉशिंग्टनमधील कॅपिटॉल या संसदभवनात डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांनी जो नंगानाच घातला आणि लोकशाहीचे जे धिंडवडे काढले, त्याला सर्वस्वी ट्रम्पच जबाबदार आहेत. अमेरिकेत औपचारिक सत्तांतर होण्यास अजून आठवडा शिल्लक असला, तरी ट्रम्प यांचे शिल्लक राहिलेले दिवसही बरखास्त केले पाहिजेत. त्यांची एकूणच भाषा पाहता त्यांंच्यावर राजद्रोहाचाच खटला भरला गेला पाहिजे. अमेरिकेतील ही घटना जशी अनपेक्षीत होती तसेच तेथील सुरक्षा रक्षकांनाही अध्यक्षांचेच समर्थक चालून येतील असे वाटले नसणार. सुरुवातीला या हल्लेखोरांना संयमाने हाताळण्याकडे त्यांचा कल होता. परंतु ट्रम्प यांचे सशस्त्र समर्थक काँग्रेसच्या बैठकीत घुसले असते, तर अनवस्था प्रसंग ओढवला असता. त्यातील अनेकांच्या हातात पिस्तुले होती. ते ती नाचवत धमकावित होते. सिनेटच्या शंभर सदस्यांपैकी दोन जागांवर जॉर्जियातून डेमॉक्रॅटिक उमेदवार नुकतेच जिंकल्याने, तेथील बलाबल हे रिपब्लिकन 50 आणि डेमॉक्रॅटिक 50 असे समतुल्य झाले. कमला हॅरिस यांच्याकडे सभागृहाच्या सभापती या नात्याने निर्णायक मत आहे. याचा अर्थ, प्रतिनिधी गृह आणि सिनेट या काँग्रेसच्या दोन्ही सभागृहांमध्ये नव्या अध्यक्षीय नावावर शिक्कामोर्तब होणे, ही औपचारिकता बनली होती. ट्रम्प जॉर्जियातील निकालांमुळे खूपच बिथरलेलेे दिसले. अध्यक्षीय निकाल जाहीर झाल्यानंतर आणि निवडणूक आयोगाने जो बायडेन यांना विजयी घोषित केल्यानंतर, डोनाल्ड ट्रम्प यांनी एकदाही आपला पराभव खिलाडूपणे मान्य केला नाही. आता इतका तमाशा झाल्यानंतरही मात्र ट्रम्प सत्तांतर शांततेत होईल, असे शहाजोगपणे सांगत आहेत. पण त्यांच्यावर विश्‍वास ठेवणार कोण असा सवाल आहे. सर्वात गंमतीची बाब म्हणजे, अशाच लोकशाही पध्दतीने निवडणुकीने ट्रम्प महाशय चार वर्षापूर्वी निवडून आले होते. आता मात्र सत्ता त्यांना सोडवत नाही. जनतेचा कौल त्यांना मान्य नाही. मग ही कसली लोकशाही असाही सल्ला उपस्थित होतो. अमेरिकेतील लोकशाही व तेथील लोकशाही पद्दती, लोकशाहीला दिला जाणारा सन्मान याचा जगात भांडवली विचाारांचे देशांपुढे आदर्श ठेवला जातो. कम्युनिस्ट चीन असो किंवा अन्य देशात लोकशाहीचा कसा गळा आवळला जातो याचे सरभरीत वर्णन अनेक जण करतात. लोकशाही अमेरिकेत कितीही रुजली असे आपण म्हणत असलो तरी या लोकशाहीचा पाया किती भूसभुशीत आहे हेच यावरुन दिसते. लोकशाहीच्या नावाने गळे काढणारेच लोकशाही कशी बुडवू शकतात हे यावरुन समजते. गेल्या चार वर्षात ट्रम्प यांनी अमेरिकन अस्मिता जागृत करुन लोकांची दिशाभूल केली. अमेरिकेत नोकर्‍या वाढविण्याचे दिलेले आश्‍वासन काही पाळले नाही. त्याचबरोबर समाजातील दुफळी वाढविण्यास मदत केली. अमेरिकेन मतदार फार जागृत असल्याचा दावा केला जातो. खरे तर ट्रम्प हे काही विश्‍वासार्ह उद्योजक म्हणून ओळखले जात नाहीत. त्यांनी सरकारचा करही मोठ्या प्रमाणावर भरलेला नाही. मात्र ट्रम्प यांनी केलेल्या प्रचाराला तो बळी पडला, मात्र लगेचच चार वर्षांनी त्यांनी आपली चूक सुधारली. आपल्या अध्यक्षपदाच्या चार वर्षात बेबंद, बेछूट आणि मस्तवाल वर्तन करून, ट्रम्प यांनी स्वत:च्या कारकिर्दीची अखेरही तितकीच घृणास्पद करून घेतली. हिंसाचार होण्याच्या आधी डोनाल्ड ट्रम्प यांनी जे भाषण केले, ते संसद, न्यायालये, निवडणूक आयोग यांच्यावर विश्‍वास व्यक्त करणारे नव्हते. ट्रम्प हे वेडाचार करीत असले, तरी रिपब्लिकन पक्षातील इतर प्रमुख नेत्यांनी काँग्रेसच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज सुरळीत पार पाडण्यात आले. गेली चार वर्षे सातत्याने अमेरिकी समाजात विविध निमित्तांनी आणि वेगवेगळे काल्पनिक शत्रू उभे करून जी विषपेरणी केली त्यातूनच हा उन्माद आला होता. याला कृष्णद्वेषापासून गैर अमेरिकींच्या तिरस्कारापर्यंत अनेक छटा आहेत. याचे पडसाद भविष्यातही उमटणार आहेत. या देशाचा भाग्यविधाता मी सोडून दुसरा कुणीही असूच शकत नाही, या मनोरुग्णतेने हिटलरसहित सार्‍या हुकूमशहांना ग्रासले होते. यामागे मुलामा लोकशाहीचा असला, तरी ट्रम्प याच मानसिक आजाराचेे बळी आहेत. ट्रम्प यांचा अवतार आता संपेल. मात्र त्यांंनी समाजात जे विष पेरले आहे ते लवकर विसरणे कठीण आहे. ट्रम्प यांनी सर्व लोकशाही देशांना मात्र या निमित्ताने धडा शिकविला आहे. त्यामुळे भारतासह विविध देशांनी आपली लोकशाही कशी टिकेल यासाठी प्रयत्न करीत राहिले पाहिजे. लोकशाहीला लख लावणारे कोणताही मुखवटा धारण करुन येतात, मात्र हा मुखवटा ओळखणे गरजेचे आहे. 

 

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top