कोरोनाची लढाई लढण्यासाठी आता प्रशासन, पोलीस, आरोग्यसेवेतील डॉक्टरांपासून आयाबाईपर्यंत सर्वच सज्ज झाले आहेत. यातील पोलीस व रुग्णसेवा देणार्‍यांच्या सेवेला सलाम करावा लागेल. सध्या सरकार व खासगी अशा दोन्ही यंत्रणेतील डॉक्टर अहोरात्र सेवा करीत आहेत. ही सेवा देत असताना, आपल्याला याची लागण होऊ शकते, याची कल्पना असतानाही दुसर्‍याचा जीव वाचविण्यासाठी लाखो डॉक्टर आज आपला जीव धोक्यात घालून काम करीत आहेत. चीन, इटलीत काही डॉक्टर रुग्णांना बरे करीत असताना, स्वत:चा जीव गमावून बसले आहेत. आपल्याकडील सरकारी आरोग्य सेवेतील अपुर्‍या सुविधा, अनेक त्रुटी यावर मात करीत अनेक डॉक्टर जोमाने कामाला लागले आहेत. आपण नेहमीच सरकारी आरोग्य यंत्रणेवर टीका करीत असतो. परंतु, ही टीका यात सुधारणा व्हावी यासाठी असते. अनेकदा डॉक्टरांच्या हातून पेशंट मरण पावला तर त्या संबंधित डॉक्टरांना बेदम मार दिला जाण्याच्या घटना आपल्याकडे काही कमी घडत नाहीत. या घटना कदाचित रुग्णांच्या नातेवाईकांकडून भावनेच्या भरातही घडत असतील; परंतु त्या घटना टाळल्या पाहिजेत. डॉक्टरांवर हात उगारणे चुकीचेच आहे. एक लक्षात ठेवले पाहिजे की, डॉक्टर हा नेहमीच प्रत्येकाचा जीव वाचविण्यासाठीच आपले काम करीत असतो. अगदी मृत्यूशय्येवरील एखाद्या वयोवृद्ध रोग्यालादेखील डॉक्टर शेवटपर्यंत वाचविण्याचा प्रयत्न करतात. अनेकदा त्या रुग्णाच्या नातेवाईकांनाही आता मृत्यू यावा व रुग्णाच्या सध्याच्या यातनातून सुटका व्हावी, असे वाटत असते; परंतु डॉक्टर त्याच्या हातून मृत्यू देत नाही तर शेवटपर्यंत त्याचा जीव वाचविण्याचा प्रयत्न करतो. समोर असलेला रुग्ण हा कोणत्या जातीचा, धर्माचा, पंथाचा आहे, याचा विचार न करता डॉक्टर तळमळीने त्याला वाचविण्याचा प्रयत्न करीत असतात. कारण, त्यांना वैद्यकीय शिक्षण देतानाच रुग्णाचा जीव वाचविण्याचे प्रशिक्षण दिले जाते, रुग्ण मारण्याचे नाही. शेवटी डॉक्टर हादेखील माणूसच आहे, क्वचितच त्याच्या हातून एखादा रुग्ण दगाऊही शकतो; परंतु तो ते जाणूनबुजून करीत नाही, हे लक्षात घेतले पाहिजे. आज जागतिक पातळीवर आलेल्या कोरोना विषाणू संसर्गाच्या काळात त्याविरोधात लढणारे डॉक्टर पाहिले की, ही सेवा म्हणजे मानव जातीची सेवा किती महान आहे, याची प्रचिती येते. प्रबोधनकार ठाकरे व संत गाडगेबाबा यांनी या रुग्णसेवेचा नेहमीच पुरस्कार केला आहे. दगडाचा देव तुमच्या मदतीला धावून येणार नाही, हे प्रबोधनकारांचे वाक्य आज सर्वांना पटते आहे. आज आपल्याला कोरोनामुळे मंदिर, मस्जीद, चर्च अशी सर्वच धर्मियांची धर्मस्थळे बंद करावी लागली आहेत, तेथील देव हे दरवाजाआड बंद झाले आहेत. मात्र, रुग्णालये खुली आहेत. तेथील डॉक्टर व त्यांचे सहकारी रुग्णांना वाचविण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करीत आहेत. मानवाची सेवा करा, रुग्णांची सेवा हीच खरी ईश्‍वर सेवा हा गाडगेबाबांचा संदेश आज आपल्याला डॉक्टर मंडळी पटवून देत आहेत. त्यामुळे भविष्यात आपल्याला धर्मस्थळे नको, कोणा थोर पुरुषांचे पुतळे नकोत, कोट्यवधी रुपये खर्चून उभारली जाणारी स्मारके नकोत, तर अत्याधुनिक रुग्णालये हवी आहेत. कोरोनाने आपल्याला हे एक मोठे वास्तव पटवून दिले आहे. इटली, फ्रान्स या युरोपातील देशात अत्याधुनिक आरोग्यसेवा असतानादेखील तेथे एवढ्या संख्येने मृत्यू झाले आहेत. जर तेथे ही अत्याधुनिक सेवा नसती, तर या देशांचे काय झाले असते, याचा विचारही करता येत नाही. आज आपल्याकडे सरकारी सेवेत प्रामुख्याने ग्रामीण भागात डॉक्टर येत नाहीत, अशी तक्रार केली जाते. परंतु, डॉक्टरांना चांगला पगार व इतर सेवा उपलब्ध करुन दिल्यास जरुर येतील. खरे तर, आरोग्याच्या धोरणाबाबत आपले सरकारच फार गांभीर्याने घेत नाही. आपल्याकडील बहुतांशी रुग्णसेवा ही खासगी क्षेत्राच्या ताब्यात देऊन स्वत: निर्धास्त राहण्याचा सरकारचा कल आहे. परंतु, तो चुकीचा आहे. आज जगात आरोग्यसेवा ही शासकीय यंत्रणेमार्फतच चालविली जाणे यात हित आहे, असे समजले गेले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वसामान्यांसाठी आयुष्यमान सेवा सुरु केली; परंतु त्याची अंमलबजावणी अतिशय निराशजनक आहे. ही सेवा जर सर्वसामान्यांपर्यत पोहोचवायची असेल, तर सर्वात प्रथम सार्वजनिक आरोग्य सेवाच मजबूत करावी लागेल. त्यासाठी सध्या राष्ट्रीय सकल उत्पन्नाच्या जेमतेम दोन टक्के जो आरोग्यावर खर्च केला जातो, तो खर्च वाढवावा लागेल. आपला शेजारी चीनदेखील दहा टक्के आरोग्यावर खर्च करतो, हे लक्षात घेतले पाहिजे. कोरोनासारखे आणखी भयंकर आजार भविष्यात येतील किंवा येणारही नाहीत. मात्र, प्रत्येक नागरिकाला उत्कृष्ट आरोग्य सेवा माफक दरात उपलब्ध करुन देणे, हे सरकारचे प्रथम कर्तव्य आहे. यासाठी सार्वजनिक आरोग्य सेवा मजबूत करणे याला पर्याय नाही. आज आपल्याकडे रुग्णालयाच्या इमारती ग्रामीण भागात उभ्या आहेत; परंतु डॉक्टर नाहीत, अ

अवश्य वाचा

देशात 25 हजार रुग्णांची वाढ