दहशतवादापासून आज जगातील कोणताही देश सुरक्षित राहिलेला नाही. त्यामुळे हा प्रश्‍न कोणत्याही एका देशाचा नसून, या दहशतवादाने सर्व जगात आपली पावलं पसरलेली आहेत. त्यामुळे जागतिक शांतताच धोक्यात आलेली आहे. मे 1991 मध्ये काँग्रेस पक्षाच्या प्रचारादरम्यान तामिळनाडू राज्यातील श्रीपेरंबुदुर येथे सभेला संबोधित करत असताना दहशतवाद्यांनी त्यांची हत्या घडवून आणली. या दिवसांचे औचित्य साधून 21 मे हा दिवस दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिवस म्हणून पाळला जातो.

21 मे या दिवशी भारताचे माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांची पुण्यतिथी साजरी केली जाते. हाच दिवस दहशतवादविरोधी दिवस म्हणून संपूर्ण देशात पाळला जातो. या देशाचे सर्वात तरुण पंतप्रधान म्हणून त्यांनी सन 1984 ते सन 1989 पर्यंत काम पाहिले. मे 1991 मध्ये काँग्रेस पक्षाच्या प्रचारादरम्यान तामिळनाडू राज्यातील श्रीपेरंबुदुर येथे सभेला संबोधित करत असताना दहशतवाद्यांनी त्यांची हत्या घडवून आणली. या दिवसांचे औचित्य साधून 21 मे हा दिवस दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिवस म्हणून पाळला जातो. यानिमित्ताने संपूर्ण जगात शांतता प्रस्थापित व्हावी व अहिंसेचा संदेश सर्वत्र पोहोचवावा, तसेच देशासाठी दहशतवादाविरोधात लढणार्‍या हजारो सैनिकांच्या बलिदानाचा सन्मान करणे, भावी पिढीला मुलग्रामी प्रभावापासून वाचविणे, त्यांच्या मनामध्ये देशाच्या प्रगतीसाठी, संरक्षणासाठी जागरुकता निर्माण करणे, हादेखील या दिवसाचा उद्देश आहे.

आजच्या स्थितीला संपूर्ण जगात ज्या-ज्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे, त्यापैकी सर्वात मोठी आणि दुरगामी परिणाम करणारी समस्या म्हणजे दहशतवाद व हिंसाचार आहे. या दहशतवादामुळेच संपूर्ण जगाची शांतता भंग पावली आहे. फार मोठ्या प्रमाणावर सामाजिक समस्यांना सामोरे जावे लागत असून, समाज त्यामुळे आपले स्वास्थ्य हरवून बसला आहे. दहशतवाद या समस्येने देशाची फार मोठी आर्थिक हानी केलेली असून, प्रगतीचे मार्ग बंद करण्यात याचा फार मोठा वाटा आहे. दहशतवाद व हिंसाचार याचे मूळ हे धार्मिक महत्त्वाकांक्षेत असून, आपला धर्म हा सर्वात श्रेष्ठ आहे. धर्माचा प्रचार व प्रसार व्हावा, हा यामागील सर्वात मोठा हेतू आहे.

त्यासाठी अत्यंत विषारी आणि विखारी प्रचार मोठ्या प्रमाणावर केला जातो म्हणून दहशतवाद निर्माण करणारी देशभर पसरलेली केंद्रे संपवणे व धर्मांधतेला प्रोत्साहन देणार्‍या संस्था, संघटनांची दुकाने बंद करणे आवश्यक आहे. आज सर्व जगच दहशतीच्या छायेखाली सापडलेले असून, कोणत्या ठिकाणी कधी हल्ला होईल याची सततची टांगती तलवार प्रत्येकाच्या डोक्यावर झुलत असते.  कोणताही मनुष्य आज सुरक्षित आहे, हे खात्रीपूर्वक सांगणे कठीण झालेले आहे. मुंबई, दिल्लीसारख्या मोठ्या शहरातील माणूस सकाळी घराबाहेर पडला, तर संध्याकाळी तो सुखरूप घरी परतेल की नाही, याची खात्री देता येत नाही, ही वस्तुस्थिती आहे. भारतातील दहशतवादाचा विचार केला तर, अनेक वेळा दहशतवादी हल्ले झालेले आहेत. मग तो मुंबई लोकल ट्रेनमधील साखळी बॉम्ब हल्ला असेल, सी.एस.टी. रेल्वेस्टेशनवर तसेच हॉटेल ताज, हॉटेल ओबेरॉय येथील हल्ला असेल, या देशाचा मानबिंदू म्हणून ज्याकडे आदराने पाहिले जाते त्या पवित्र संसदेवरदेखील अतिरेक्यांनी हल्ला केला, तसेच उरी, पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांच्या गाड्यांच्या ताफ्यावर झालेला हल्ला असेल असे अनेक वर्षानुवर्षे दहशतवादी प्रवृत्ती हल्ले करत असून, जम्मू-काश्मीर येथे नियमित असे हल्ले होत आहेत. त्यामुळे हजारो निरपराध नागरिक, कर्तव्यावरील भारतीय सैनिक पोलीस दल यांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.

दहशतवाद्यांच्या हल्ल्यामुळे फार मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झालेली आहे आणि होत आहे हे आपण वाचतो, पाहतो. परंतु, वाईट या गोष्टीचे वाटते की, काहीही चूक नसताना निरपराध नागरिकांना मरणयातना भोगाव्या लागतात; हे लोक या दहशतवादाचे बळी ठरतात, त्यामुळे त्यांच्यावर अवलंबून असणारे आई-वडील, पत्नी-मुले, भाऊ-बहीण यांचे सर्व स्वप्नच हिरावले जातात आणि जीवनाच्या दुःखाकडे त्याची वाटचाल सुरू होऊन एक हसते-खेळते कुटुंब उद्ध्वस्त करून संपूर्ण आयुष्यातील त्याचे हास्यच हा दहशतवाद हिरावून घेतो. काहीही चूक नसताना सामान्य माणसाला आयुष्यातून उठवले जाते. सन 1993 मध्ये मुंबईत झालेला हल्ला असाच एक हल्ला होता. या हल्ल्यात सर्वसामान्यांबरोबरच केरळचा उन्नीकृष्णनसारख्या जाबाज लष्करी अधिकार्‍यांचा दहशतवादाने बळी घेतला. तुकाराम ओंबळे, शशांक शिंदे, करकरे साहेब, कामठे साहेब, साळसकरांसारखे मुंबईची शान असलेले हे पोलीस अधिकारी कर्तव्य भावनेने लढत असताना, दहशतवादाचे बळी ठरले, तसेच अनेक सैनिक शहीद होत आहेत. आज त्यांच्या कुटुंबाची न भरून येणारी हानी तर झालीच; पण या सर्वांच्या कुटुंबातील आनंद हास्य कायमचे लोप पावले, हे सर्व मन सुन्न करणारे आहे. म्हणून प्रश्‍न पडतो की, त्यांची काय चूक होती उत्तर मात्र कितीही शोधले तरी मिळत नाही. म्हणून या दहशतवादी प्रवृत्तीला सांगावेसे वाटते...

दिलोमे नफरतो का बीज बोना कैसा होता है।

दहशतगरो जरा सोचो की, रोना कैसा होता है।

हो तुमभी अगर इन्सान तो जाकर पुछो अपनी मॉवोसे,

बुढापे मे जवा बेटा खोना कैसा होता है।

दहशतवादापासून आज जगातील कोणताही देश सुरक्षित राहिलेला नाही. त्यामुळे हा प्रश्‍न कोणत्याही एका देशाचा नसून, या दहशतवादाने सर्व जगात आपली पावलं पसरलेली आहेत. त्यामुळे जागतिक शांतताच धोक्यात आलेली आहे. तोच प्रयत्न या दहशतवादी वृत्तीचा मुख्य असून, यासाठी या प्रवृत्तीविरोधात सर्व जगाने एकत्र येऊन या आत्मघातकी प्रवृत्तीचा बिमोड कसा होईल याचा विचार करून प्रभावी उपाययोजनांची अंमलबजावणी करून जागतिक शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करणे, ही काळाची गरज आहे, अन्यथा सर्व जगच दहशतवादामुळे प्रभावित होऊन शांतता गमावून बसेल, आणि ही जागतिक शांतता भंग करणे हाच या वृत्तीचा मूळ उद्देश असून, तो असफल करणे, ही सर्व देशाची प्राथमिकता असली पाहिजे.

 

अवश्य वाचा

आज पासून नवी सुरुवात!