जिओने पदार्पणापासूनच ग्राहकांना सवलतींची सवय लावली. मक्तेदारी निर्माण होऊ घातल्यानंतर त्यांनी आता स्पर्धक कंपन्यांना तशा सवलती द्यायला विरोध केला आहे. ङ्गट्रायफच्या नव्या आदेशाचा अर्थही तसाच आहे. आर्थिक ताकदीच्या जोरावर इतर स्पर्धक कंपन्यांना संपवायचं आणि नंतर बाजारावर आपलं अधिराज्य गाजवायचं, हे ङ्गजिओफचं सध्याचं तंत्र आहे. आताही भारतातून टूजी तंत्रज्ञान संपवायचा निर्धार ङ्गजिओफने केला आहे. त्यासाठी ही कंपनी वर्षभरात भारतात स्वदेशी तंत्राचा वापर करून ङ्गफाईव्ह जीफ सेवा आणणार आहे. त्यानंतर देशात फक्त फोर-जी आणि फाईव्ह-जीचं तंत्रज्ञान असेल आणि टू जी आणि थ्री जीचं तंत्रज्ञान मोडीत निघेल. त्यासाठी ङ्गजिओफ गूगलच्या मदतीने स्वस्त मोबाईल संच बाजारात आणेल. रिलायन्स कम्युनिकेशननंही तेच केलं होतं, हे आता लोकांना आठवू शकेल. रिलायन्स ङ्गजिओफच्या नवीन मोबाईल हँडसेटचं मूळ हार्डवेअर क्वालकॉम आणि इंटेल बनवतील तर त्याची ऑपरेटिंग सिस्टीम ङ्गगूगलफकडून तयार केली जाईल. रिलायन्स ङ्गजिओफनं ज्या प्रकारे पूर्ण संप्रेषण तंत्रज्ञान आधारित कंपनी बनण्याचा पाया घातला आहे, तो पाहता ही कंपनी केवळ चिनी कंपन्यांना फाईव्ह जी सेवेमध्येच आव्हान देणार नाही तर येणार्‍या काळात भारताच्या हँडसेट बाजारामध्ये चिनी कंपन्यांच्या वर्चस्वालाही आव्हान देईल.

ङ्गरिलायन्स इंडस्ट्रीजफचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी मोबाइल ग्राहकांच्या सर्व टू-जी सेवा प्रदात्यांना 4 जी आणि 5 जी मध्ये रूपांतरित करण्याविषयी वापरलेली भाषा पाहिली तर टूजी आणि थ्री जी मोबाईल सेवा देणार्‍या विद्यमान टेलिकॉम कंपन्यांसाठीही धोका आहे. यामुळेच ङ्गजिओफने एका दगडात अनेक पक्षी मारल्याचं दिसत आहे. नव्या मोबाइल संचांसाठी ङ्गगूगलफ स्वतंत्रपणे एक विशेष अँड्रॉईड ऑपरेटिंग सिस्टीम विकसित करेल. या सिस्टीमवर फेसबुक आणि व्हॉट्सअ‍ॅपदेखील चालू शकतील. त्याचं कारण या सर्व कंपन्या रिलायन्स ङ्गजिओफच्या भागीदार आहेत. या सर्व कंपन्यांना एकत्र आणण्यामागे भारताचे 35 कोटी ग्राहक आहेत, जे टूजी आणि थ्रीजी मोबाइल वापरतात. कंपनीनं असं गृहीत धरलं आहे की सुमारे सहा ते आठ कोटी ग्राहक लगेच फोर जी सेवेत येऊ शकतात. रिलायन्स ङ्गजिओफच्या या तयारीचा अप्रत्यक्ष परिणाम एअरटेल, बीएसएनएलवर होऊ शकतो. कारण, सध्या या कंपन्यांचे 35 कोटी ग्राहक असे आहेत, जे टूजी तंत्रज्ञान वापरतात. ङ्गजिओफने इतर मोबाइल कंपन्यांचे ग्राहक आकर्षित करण्याची ही पहिली वेळ नाही. याआधीही इतर कंपन्यांमधल्या सहा कोटी मोबाइल फोन ग्राहकांना तिने आकर्षित केलं आहे.

मार्च 2020 पर्यंत ङ्गजिओफचे 38 कोटी 75 कोटी ग्राहक होते. सध्या ङ्गजिओफचा बाजार हिस्सा 33.47 टक्के आहे. ही भारतातली सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी आहे. रिलायन्स जिओ स्मार्टफोन मार्केटमध्ये किती ताकदीनं उतरत आहे, ते गेल्या काही दिवसात झालेले करार पाहिले तर लक्षात येईल. दूरसंचार क्षेत्रात अगोदरच वर्चस्व असलेल्या जिओनं गूगल आणि क्वालकॉमसोबत भागीदारी केल्यामुळे भारतात प्रस्थापित झालेले चीनचे ब्रँड मात्र कमालीचे धास्तावले आहेत. गूगल रिलायन्स जिओचे 33 हजार कोटी रुपयांचे समभाग विकत घेणार आहे. पुढील काळात गूगल आणि जिओ अँड्रॉईड आधारित एक परवडणारा फोन बाजारात आणणार आहेत. त्यामुळे भारतीय बाजारात स्थिर झालेल्या चीनच्या कंपन्यांनी धसका घेतला आहे. सध्या भारतीय बाजारात शाओमी, रिअलमी, ओप्पो, विवो या चीनी ब्रँड्सचं वर्चस्व आहे. एंट्री लेव्हलच्या फोनमुळे या कंपन्या लोकप्रिय झाल्या. बाजारातल्या हिस्सेदारीच्या बाबतीत बोलायचं झालं, तर चीनच्याच कंपन्यांचा दबदबा आहे. मिड रेंज आणि प्रीमिअम रेंज हँडसेट्सच्या बाजारपेठेमध्येही चीनच्या कंपन्या आपलं वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्या तरी परवडणार्‍या फोनच्या बाबतीत मात्र चीनच्या फोनशिवाय ग्राहकांना अत्यंत कमी पर्याय आहेत. चीनच्या कंपन्यांना आता पहिल्यांदाच चिंता जाणवू लागली आहे. कारण, बाजारातील स्पर्धेत उडी घेतल्यानंतर संपूर्ण समीकरणं बदलण्याची जिओची ताकद आहे. सध्याची चीनविरोधी भावनाही जिओ आणि गूगलला मोठ्या प्रमाणात व्यवसायवृद्धीसाठी मदत करू शकते. अशा प्रकारचा फोन आणण्याची गूगलची पहिलीच वेळ नाही.

महत्त्वाचं म्हणजे जिओनं जगातली सर्वात मोठी चिपमेकर कंपनी असलेल्या क्वालकॉमसोबतही भागीदारी केली आहे. गूगल आणि क्वालकॉमच्या मदतीनं जिओ हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर या दोन्ही क्षेत्रात आपली ताकद वाढवत आहे. जिओने अगोदरच फीचर फोन बाजारात आपलं स्थान मजबूत केलं आहे. आता गूगल आणि क्वालकॉमची साथ चीनच्या कंपन्यांची चिंता वाढवण्यासाठी पुरेशी आहे. आता रिलायन्स जिओमार्टवर इलेक्ट्रॉनिक, फार्मास्युटिकल आणि फॅशन वस्तूंची ऑर्डर घेण्यासही सक्षम असेल. दुसरीकडे, रिलायन्स स्वच्छ इंधन आणण्याची तयारी करत आहे. सध्या रिलायन्स काही शहरांमध्ये डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात कार्यरत आहे. आता तिचा विस्तार होणार आहे. रिलायन्स जिओ मार्ट येत्या काळात अ‍ॅमेझॉन आणि फ्लिपकार्टसारख्या परदेशी ई-कॉमर्स कंपन्यांशी स्पर्धा करणार आहे. लवकरच, रिलायन्सच्या जिओ मार्टमध्ये किराणा वस्तूंबरोबरच इलेक्ट्रॉनिक्स, औषधं आणि फॅशनच्या वस्तूंच्या विक्रीला सुरुवात होईल. रिलायन्स जिओनं लाँच केलेल्या जिओ मार्ट या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर किराणा दुकानदारांची भर पडली आहे. जिओ मार्टमध्ये अशा वस्तूंच्या पुरवठ्याची सुरूवात झाल्यानंतर छोट्या शहर आणि ग्रामीण भागातही ई-कॉमर्स सुरू होईल. छोटी किराणा दुकानं जिओ मार्टमध्ये सामील होत असून, छोट्या शहरातल्या किराणा दुकानातून इलेक्ट्रॉनिक्स वस्तू वितरणाचं काम केलं जाईल. नुकत्याच सुरू झालेल्या जिओ मार्टकडं दररोज अडीच लाख ऑर्डर्स येत आहेत.

सध्या जिओ मार्ट देशातल्या 200 शहरांमध्ये कार्यरत आहे. रिलायन्स रिटेल्सची सुमारे 12 हजार स्टोअर्स आधीच कार्यरत आहेत आणि यातली दोन तृतीयांश स्टोअर्स टियर-2, टियर-3 आणि टियर-4 शहरांमध्ये आहेत. रिलायन्स रिटेल्सची उलाढाल एक लाख 62 हजार 936 कोटी रुपयांची आहे. आता रिलायन्स पवन आणि सौर ऊर्जा व्यवसायातही प्रवेश करण्याची तयारी करत आहे. ही कंपनी सेल आणि बॅटरीदेखील बनवेल. अमेरिका आणि चीनदरम्यानच्या तंत्रज्ञानाच्या शीतयुद्धानं तयार झालेल्या वातावरणात जगातला सहाव्या क्रमांकांचा श्रीमंत माणूस वेगळ्या क्षेत्रात पाऊल टाकू इच्छित आहे. त्यानं चीनच्या दिग्गज कंपन्यांना आव्हान देण्यासाठी जगातल्या अनेक कंपन्यांशी कोरोनाच्या काळात करार केले. अमेरिका, ब्रिटन आणि भारतासह अनेक राष्ट्रांमधील राजकारणी ङ्गहुवेईफ या कंपनीला वाळीत टाकत आहेत. चिनी सत्ताधारी पक्षाशी या कंपनीचा संबध असल्याचा प्रचार केला जात आहे. हुवेई आणि झेडटीई या दोन दिग्गज कंपन्या फाईव्ह जी क्षेत्रात काम करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांनाच अमेरिकन कंपन्यांच्या मदतीनं शह देण्याबरोबरच जागतिक स्तरावर काम करण्याचा निर्धार रिलायन्सच्या अध्यक्षांनी केला आहे. इतक्या कंपन्यांना गुंतवणुकीसाठी दारं खुली का केली जात आहेत, याचा उलगडा आता होत आहे.

मुकेश अंबानी यांच्या चार वर्षे वयाच्या जिओ प्लॅटफॉर्मनं स्वदेशी फाईव्ह जी तंत्रज्ञान तयार केलं असल्याची घोषणा परवा केली. भारतातल्या 40 कोटी फोर जी वापरकर्त्यांकडून चाचणी घेतल्यानंतर हे तंत्रज्ञान बाजारात येईल. अंबानी यांच्या नियंत्रणाखाली असलेल्या ङ्गन्यूज 18 डॉट कॉम वेबसाइटफनं या तंत्रज्ञानाला हुवेई-किलर असं संबोधलं आणि अमेरिकेचे परराष्ट्र सचिव माईक पोम्पिओ यांनी चिनी कंपनीच्या गीअरचा वापर न केल्याबद्दल ङ्गस्वच्छ नेटवर्कफ म्हणून जिओचं कौतुक केलं. हे पाहिलं, तर चीनच्या कंपन्यांच्या विरोधात जिओला अमेरिकेचं बळ कसं मिळत आहे ते स्पष्ट होतं. हुवेई, अ‍ॅमेझॉन, झेडटीई, झूम आदींना अंबानी किती समर्थ पर्याय देतात आणि यानिमित्ताने किती अ‍ॅप्स तयार होतात, याकडे आता संपूर्ण विश्‍वाचं लक्ष लागलं नसेल, तरच नवल.

 

अवश्य वाचा