Wednesday, December 02, 2020 | 12:12 PM

संपादकीय

शेतकर्‍यांचा एल्गार

राजधानी दिल्लीत कडाक्याच्या भर थंडीत शेतकर्‍यांनी घेराव घातल्याने......

भारतात सुट्ट्यांचा सुकाळ पण कामाचा दुष्काळ
रायगड
11-Nov-2020 06:50 PM

रायगड

हिंदू कालगणनेनुसार चालू वर्षी अधिक अश्‍विन महिना आल्यामुळे  ऑक्टोबरमध्ये साजरा होणारा दिवाळीचा सण नोव्हेंबर महिन्यात साजरा होत  आहे.  हा सण आपल्या कुटुंबियांसमवेत साजरा करण्यासाठी अधिकारी, कर्मचारी, कामगार व व्यावसायिक आपल्या गावी जातात. म्हणून सुट्टीचे वातावरण निर्माण होते. त्यात भरीव भर म्हणून सुट्टयाही भरपूर आहेत. या महिन्यात   1,8, 15, 22 व 29 अशा रविवार निमित्त 5 सुट्टया गमवाव्या लागल्या आहेत.  दि.16 ला बलिप्रतिपदेनिमित्त तर दि.30 नोव्हेंबर गुरूनानक जयंती निमित्त कार्यालयीन सुट्टी आहे. सलग सुट्टयांमध्ये आर्थिक उलाढाल मंदावते. कामकाजात कमालीची शिथीलता येते. आधीच कार्यालयीन कामाबाबत उल्हास व त्यात (सुट्टयांचा)फाल्गुन मास आहे.

भारत हा अनेक धर्मांनी व अनेक पंथानी बनलेला देश आहे. या देशात बहुसंख्य  हिंदू धर्मीय असले तरी मुस्लिम, बौद्ध,  ख्रिश्‍चन, जैन, पारशी, ज्यू, शीख धर्मबंधुही  येथे  राहतात. विविधतेतून एकता हे भारताच्या एकतेचे सूत्र आहे. आपल्या देशाने निधर्मवाद स्वीकारला असून  प्रत्येक नागरिकास  धर्म  स्वातंत्र्यही आहे. आपल्या देशाने लोकशाही राज्यपद्धतीने  70 वर्षांचा खडतर प्रवास पूर्ण केला आहे.  काही मतदार अशिक्षित असूनही लोकशाही टिकून आहे. येथे रक्तपात न होता अनेकवेळा सत्तांतरे घडविली  आहेत. काँग्रेसच्या धुरंधर नेत्या व तत्काालीन पंतप्रधान  इंदिरा गांधी  याचा पराभव करून जनता नेते मोरारजीभाई  देसाई  पंतप्रधान झाले. भाजप नेते  अटल बिहारी वाजपेयी 3 वेळा पंतप्रधानपदी निवडले गेले.  विद्यमान पंतप्रधान व भाजप चे नेते नरेंद्र मोदी  दुसर्‍यांदा  पंतप्रधानपद भूषवित आहे. कारण भारतीयांच्या नसानसात लोकशाही भिनली आहे. भगवान श्रीकृष्ण,  भगवान गौतम बुद्ध, वर्धमान महावीर यांचा वारसा  या देशाला लाभला आहे. महात्मा गांधींजी,  फिरोज शहा मेथा, दादाभाई नौरोजी, अबुल कलम आझाद, बॅ.विनायक दामोदर सावरकर, साने गुरुजी,  डॉ.बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू महाराज या हिमालय पर्वताएवढी ज्ञानाची उंच व अरबी सागराएवढी खोली असलेल्या  नेत्यांनी  भारतभूमीचे राष्ट्रीयत्व जोपासले. म्हणून आपल्या देशावर  अनेक  संकटे  येऊनही ऐक्य टिकून  आहे. भारताचे विघटन  करण्यासाठी  शत्रूराष्ट्र  प्रयत्नशिल आहेत. भारतातील अंतर्गत शत्रूंचाही त्यात समावेश आहे. धर्माच्या नावावर बंड पुकारण्याचे प्रयतन झाले. पण जनतेकडून प्रतिसाद मिळाला नाही. पंजाब प्रांत भारतातून  शिखीस्तानची चळवळ उभारली गेली पण तत्कालीन पंतप्रधान इंदिराजींनी मोडित काढली

धार्मिक सण हा आनंदाचा तसेच दैनंदिन  कामकाजातील विरंगुळ्याचा दिवस असतो. त्यावेळी  वातावरण पवित्र  असते. आपापसातील मतभेद तसेच राग, द्वेश विसरून प्रत्येकजण सण साजरा करण्यात दंग असतो. यावेळी  ऐक्य  राखले जाते. त्या ऐक्याचा विधायक  कार्यासाठी वापर  करता यावा म्हणून लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव हा सार्वजनिक  स्वरुपात साजरा करण्याची प्रथा  सुरू केली.  त्यामुळे ब्रिटीश विरोधी वातावरण तयार झाले. म्हणून स्वातंत्र्य चळवळीस बळकटी आली. शेवटी स्वातंत्र्य मिळाले. याच तंत्राचा वापर करुन हिंदू धर्मीयांनी होलिकोत्सव व दिपावली, मुस्लिम धर्मीयांचा मोहरम व  बकरी ईद,  ख्रिश्‍चन धर्मियांचा नाताळ आणि गुड फ्रायडे. पारशी बधुंचा पतेती, ज्यू लोकांचा पुरीम,  जैन धर्मियांची महावीर जयंती, शीख धर्मियांचा गुरूगोविंद जयंती,  बौद्ध धर्मियांची बुद्ध जयंती  व  डॉ.बाबासाहेब  आंबेडकर जयंती हे सण  एकत्रितपणे  साजरे  करावयास हवेत. प्रत्येक धर्मातील आख्यायिका समजावून घ्यायला हवी. कारण प्रत्येक धर्माचा  मुख्य हेतू आपआपसातील कलह दूर  करून ऐक्य साधणे  हाच आहे.

आपला  सण गुण्यागोविदांने साजरा करण्याचे स्वातंत्र्य प्रत्येकास असल्यामुळे सणानिमित्त विद्यालयांना व शासकीय कार्यालयांना सुट्टी असते. ती उपभोगताना त्या सणाची आख्यायिका ज्ञात असावी. त्या त्या सणाच्या धार्मिक सोहळ्यात सहभागी व्हावे. कारण विविधतेतून एकता हे भारताचे सूत्र असून राष्ट्रीय एकात्मता साधणे हा अंतिम हेतू आहे. पण सुट्टी उपभोगताना त्या सुट्टीचे नावही माहीत नसते.

पारशी धर्मीयांचा पतेती हा महत्वपूर्ण सण आहे. त्या सणानिमित्त सार्वत्रिक  सुट्टी असते. आज कार्यालयात कोणत्या सणानिमित्त सुट्टी आहे. असे विचारता आज बँक हॉलिडे आहे एवढेच उत्तर देऊन विषय संपविला  जातो. शाळा, महाविद्यालयांमध्ये तर सुट्टयांचे प्रमाण जादा आहे. त्यात धार्मिक सुट्टयांचाही समावेश असतो. ईद-ए-मिलाद, ईल-उल्-फित्र, पतेती, खोर्दाद साल, गुड फ्रायडे,  बुद्ध जयंती इ. सणांची अधिकृत माहिती शिक्षकांनी गोळा करुन ती विद्यार्थ्यांना  द्यायला हवी. काही सणांचा समावेश क्रमिक पुस्तकात करावयास हवा. पण याबाबत शिक्षणतज्ञांना रस नाही आणि शिक्षकांना माहिती गोळा करण्यास ङ्गफुरसतफ (?) नाही.  विविध धर्मातील सणांची माहिती विद्यार्थ्यांना देण्याबाबत शिक्षणखात्याने शाळांवर सक्ती करणे गरजेचे आहे.

 भारतात विविध धर्माचे सण आनंदाले साजरे केले जातात. धर्माच्या शिकवणूकीतील मुख्य उद्देश माणसाचा ऐहिक (या जीवनातील) व पारलौकिक (मृत्यनंतर) उत्कर्ष सन्मार्गाने व सदाचाराने आणि ईश्‍वरावर श्रद्धा ठेवून साधावयाचा असतो. खरे बोलणे, प्रामाणिकपणे वागणे,  प्राणीमात्रांवर दया करणे, संकटात सापडलेल्यांना मदत करणे, ईश्‍वरावर निष्ठा ठेवणे हे आचरण-विषयक  नियम सर्व धर्मात सारखेच आहेत. धर्माधर्मात  प्रार्थनेला आगळे महत्व आहे.  एखाद्या व्यक्तीला, ग्रंथाला अगर थोर व्यक्तीजवळील वस्तूला ईश्‍वराचे अगर त्याच्या अवताराचे प्रतिक मानून त्या व्यक्तीची, ग्रंथाची अगर वस्तूची पूजा  करण्याची प्रवृत्ती अनेक धर्मीयांमध्ये आढळते.  उदाहरणार्थ येशू ख्रिस्ताजवळ क्रॉस, मक्केच्या मशिदीतील काळा दगड, शंकराचा नदी, शिखांचा ग्रंथसाहेब इत्यादी धर्मीमध्ये विवाह बंधनाचे पावित्र्य राखले जाते.धार्मिक सोहळे साजरे करताना आपापसातील मतभेद व विषमता दूर करण्याचा प्रयत्न केला जातो. या समान सूत्रामुळे भारतसारख्या खंडप्राय देशात विविध धर्माचे, विविध पंथाचे व विविध भाषिक लोक एकत्रित रहातात.

भारत हा विविध धर्मीय देश असल्यामुळे येथे सुट्टयांचा सुकाळ आहे. तो जागतिक विक्रम आहे. सुट्ट्यांमध्ये कामांचे तास विनाकारण वाया जातात. कर्मचार्‍यांची काम करण्याची मानसिकता संपते.  चालू महिन्यात 11 सुट्टया आहेत.  .1 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबरपर्यंत बँकांना एकूण 11 दिवस सुट्ट्या आहेत. ते तांबड्या फितीला आमंत्रण ठरते. कर्मचार्‍यांना महागाई निर्देशांकानुसार वेतन मिळते, महागाई भत्ता, हक्काच्या रजा, वैद्यकिय भत्ता, फिरती भत्ता सुरू असतो. काहींना बोनस मिळते.

 निवृत्तीनंतर निवृत्ती वेतन, ग्रॅच्युईटी, प्रॉव्हीडंट फंड या सुविधा आहेत . पण शेतकर्‍यांना कसलाच लाभ नाही. या कामानिमित्त शासकीय कार्यालयात हेलपाटे करून दमछाक होते. पण तांबडी फीत आड येते. लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत, नगरपरिषदांच्या निवडणुका तसेच पोट निवडणूका घेण्यासाठी निवडणूक आयोगाकडे वेगळा कर्मचारी वर्ग नाही. पोट निवडणूका सतत होत असतात. मार्च महिन्यात अंदाजपत्रक, एप्रिल मे महिन्यात पाणीटंचाई, पावसाळ्यात अतिवृष्टी व नैसर्गिक व नैसर्गिक आपत्ती दरू करण्यासाठी कोरोना महामारीचे संकट दूर होण्यासठी हाच कर्मचारी वर्ग वापरला जातो. परिणामी कार्यालयाच्या फाईली धूळ  खात पडतात, कारण भारतात आहे,  सुट्टयांचा सुकळ पण कामाचा दुष्काळ 

 

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top