आज सारा देश करोनासे लढ  रहा  है

हमारे डॉक्टर्स, पुलिस और सारी जनता ढाल बनकर कोरोनासे लढ रहे  है।

हमे  मरीजकी बिमारीसे लढ़ना है, बिमारसे नही।

हमे  उनकी देखभाल करनी  है, नही।

अशा प्रकारची वाक्ये आपण  

वरील वाक्यात ढाल बनकर  लढणारा, बिमारीसे  लढणारा उनकी देखभाल करणारा असा एकच व्यक्ती आपल्या नजरेसमोर येतो तो म्हणजे डॉक्टर

कोरोना ही जागतिक समस्या आहे. सर्व जग त्याविरुद्ध लढत आहे. आमची डॉक्टर मंडळी मग ती तरुण असो वा वयस्कर, 75 ते 80 वर्षांचे डॉक्टर सुद्धा, शासनाची दवाखाना सवलत असूनही सामाजिक बांधिलकी म्हणून, स्वतःचा जीव धोक्यात घालून कोेरोनाच्या काळात आरोग्यसेवा देत आहेत. आणि आपण कोणाविरुद्ध लढत आहोत, तर एका अज्ञात शत्रू विरुद्ध, जो आपल्याला दिसत नाही. तो अदृश्य अचानक आलेला आहे,पण बलाढ्य आहे. त्याच्या विरुद्ध जिंकण्याचा तर प्रश्‍नच नाही, फक्त आपण आपला बचाव करणे एवढेच आपल्या हातात आहे. ते सुद्धा आपल्याकडे उपलब्ध असलेल्या साधनांनी ज्याला आपण ढाल व चिलखत म्हणतो. मग ही  साधने कोणती तर

1. नाका तोंडाला मास्क बांधणे .

2. अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर पडू नये.

3. साबणाने किंवा सॅनिटायझरने स्वच्छता राखणे.

4. आपली प्रतिकारशक्ती वाढविणे, चौरस आहार  5. वेळीच डॉक्टरांचा सल्ला व औषधोपचार घेणे.  

यांसारख्या तुटपुंज्या साधनांनी आपण आपला बचाव करायचा आहे. पण या सर्व गोष्टी आपण काटेकोरपणे पाळतो का याचा विचार आपण केला केला पाहिजे. शत्रू बळकट आहे. या कोरोनाच्या साथीत आपला मुख्य योद्धा आहे डॉक्टर व पोलीस हे आपण  ऐकतो. पण आपणही  त्यांना सहकार्य केले तरच हा रोग आटोक्यात आणणे  शक्य होईल. आमच्याही आपणाकडून काही अपेक्षा आहेत.

दवाखान्यात येणार्‍या पेशंटकडून डॉक्टरांच्या अपेक्षा :-

गेल्या तीन महिन्यात कोरोना विषयक माहिती फलक वेळोवेळी आम्ही दवाखान्यात लावूनही काही  बाबींचा उल्लेख करणे आवश्यक वाटते.

1. आजही काही पेशंट मास्क न लावताच दवाखान्यात येतात. त्यांच्या खोकल्यावाटे व शिंके वाटे हा रोग पसरु शकतो. तरी त्यांनी नियमित मास्क वापरावा. रुमाल वापरत असल्यास रुमालाचा उपयोग तोंड पुसण्यासाठी करू नये.

2. दवाखान्यात आल्यावर पेशंटने अंतर ठेवून बसावे. काही पेशंट जागा असतानाही जवळ बसून गप्पा मारताना दिसतात.

3.दवाखान्यातील कोणत्याही वस्तूला शक्यतो हात लावू नये. त्यामुळे रोगांचा फैलाव होण्यास मदत होते.

4. शक्यतो पेशंटने क्लीनिकमध्ये एकट्याने जावे. शक्य नसल्यास फक्त एखादी व्यक्ती सोबत आणावी. जेणेकरून दवाखान्यात गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी.

5. डॉक्टरांच्या तपासणीच्या रूममध्ये पेशंटने एकट्यानेच जावे. अगदीच शक्य नसल्यास किंवा लहान मूल असल्यास एखाद्या व्यक्तीनेच सोबत जावे. असे अपेक्षित असतानाही काही वेळेस पेशंटचे नातेवाईक गर्दी करताना दिसतात.

6. पेशंटने शक्यतो दवाखान्याच्या वेळा पाळाव्यात. कोरोनाच्या काळात सकाळच्या व संध्याकाळच्या प्रत्येक राऊंडची वेळ संपली की डॉक्टर दवाख्यातून घरी जातात. तेव्हा त्यांना पूर्ण कपडे धुवून, आंघोळ करून (दिवसातून 2 वेळा ) घरात जावे लागते. कारण घरात लहान मुले, वयस्कर आईवडील असतात. त्यांना त्यांच्यामुळे बाधा होऊ नये यासाठी काळजी घेतात. त्यानंतर एका पेशंटसाठी त्यांना दवाखान्यात येणे कठीण असते. कारण त्यांना एका पेशंटसाठी परत नवीन कपडे घालणे आणि परत अंघोळ करणे शक्य होत नाही मग आपण नाराज होतो. पण अशा कठीण प्रसंगी ते आपल्याला सेवा देत आहेत हे समजून घेणे गरजेचे आहे. म्हणून जनतेस ही नम्र विनंती आहे की, त्यांनी या काळात वेळेचे पालन काटेकोरपणे करून डॉक्टरांना सहकार्य करावे.

7. आपल्याला ताप व खोकला येत असेल व डॉक्टरांनी आपली तपासणी करून पुढील तपासणी साठी आपणास सरकारी दवाखान्यात पाठवले असेल तर आपण नाराज होतो कारण आपल्याला ते त्रासदायक व कटकटीचे वाटते. परंतु ते आपल्याच फायद्याचे असते. असे केले नाही आणि जर ती व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह असेल तर त्या व्यक्ती पासून त्याच्या कुटुंबाला, नातेवाईकांना, डॉक्टरांना व संपर्कात येणार्‍या सर्व व्यक्तींना कोरोनाची लागण होऊन त्याचा फैलाव झपाट्याने होऊ शकतो. म्हणून अशा व्यक्तींनी पुढील उपचार त्वरित करून घेणे गरजेचे आहे.

8. दवाखान्यात गेल्यावर आपल्या आजाराची पूर्ण माहिती काहीही न लपवता डॉक्टरांना दिली पाहिजे. आपण जर कोठे बाहेरगावी प्रवास केला असेल, आपणास  ताप, सर्दी, खोकला, दमा यांसारखी फ्लूची लक्षणे असतील, आपण कोरोना बाधित पेशंटच्या संपर्कात आलेले असाल तर त्याची माहिती डॉक्टरांना देणे अत्यावश्यक आहे व जर आपणास 15 दिवस घरात राहण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला असेल तर त्याचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे आहे.

9. दवाखान्याच्या वेळेत डॉक्टर आपला कॉल अटेंड करू शकत नाहीत, तरी त्यावेळी त्यांना सतत मोबाईलला कॉल करू नये.

सर्व व्यक्तींनी डॉक्टरांना सहकार्य केले पाहिजे कारण डॉक्टर हेच आपले ढाल घेऊन लढणारे योद्धा असे आपण म्हणतो. नाहीतर हाच योद्धा कोलमडून पडेल. म्हणजे जर डॉक्टरलाच बाधा झाली तर याविरुद्ध लढणार कोण? व हे युद्ध रोखणार कसे? आज आपल्या आजूबाजूला एकजरी पेशंट सापडला तरी आपण  त्याच्यापासून वेगळे होतो. म्हणजे आपल्याला त्याच्या पासून धोका वाटतो व कोरोना होईल अशी भीती वाटते. मग जर आपण एक व्यक्तीची रिस्क घ्यायला घाबरतो तर मग आम्ही डॉक्टर मंडळी असे कित्येक पेशंट रोज तपासून कितीतरी रिस्क घेत असतो. मग आपण नको का डॉक्टरांना सहकार्य करायला! याचा विचार आपण सर्वांनी करायला हवा.

एखाद्या डॉक्टरला जर कोरोनाशी लढताना अशी लागण झाली तर त्याची अवस्था काय होईल? आमच्या कित्येक डॉक्टरांना याची लागण झालेली आहे. काहींना तर आपला जीव गमवावा लागला आहे. लागण झालेल्या डॉक्टरला दवाखाना बंद ठेवून स्वतःस वेगळे राहावे लागते. घरात किंवा कोणत्या हॉस्पिटलमध्ये बंदिस्थ व्हावे लागते.  कुटुंबापासून वेगळे राहावे लागते. ज्या डॉक्टरांनी आपल्याला कठीण काळात सेवा दिली, त्यांच्याशी आपण संपर्क तोडतो (बहिष्कार). त्याच्या कुटुंबाशी संपर्क टाळतो.

 

अवश्य वाचा