पूर्वी घरातच रमणार्‍या व्यक्तीला घरकोंबडा म्हणून हिणवलं जात असे. आता घरात बसून आपलं व्यावसायिक काम करणं हा कार्यसंस्कृतीचा एक भाग बनला आहे. पूर्वी फक्त माहिती तंत्रज्ञान उद्योगात ‘वर्क फ्रॉम होम’ ही संकल्पना सर्रास अंगभूत सवय म्हणून चालत होती. आता सर्व उद्योग, शैक्षणिक क्षेत्राला आवडो अथवा ना आवडो, कोरोना संसर्गामुळे या कार्यपध्दतीचं महत्व अनेकांना पटत चाललं आहे. घर, ऑफिस, कार्यालय, शाळा, महाविद्यालय या सर्वांचं महत्व आहेच. सतत एका जागी बसून दीर्घ कालावधीसाठी ही कार्यपद्धती नक्कीच उत्पादनवृद्धी (प्रॉडक्टिव्हिटी) देऊ शकत नाही. मात्र आजच्या घडीला जास्तीत जास्त कामं घरी बसून करण्याची गरज निर्माण झाली असताना आणि कार्यालयं किमान वेळ तसंच किमान कर्मचार्‍यांनिशी चालत असताना मनात असो वा नसो, ही कार्यपध्दती अंगिकारावी लागत आहे.

प्रत्येक कार्यपद्धतीचे फायदे-तोटे आहेत. तसंच ‘वर्क फ्रॉम होम’ या संकल्पनेचेही तोटे आहेत .येण्या-जाण्यात होणारा वेळेचा अपव्यय टाळल्याने जास्त काळ काम करता येतं हा या कार्यपध्दतीमुळे होणारा उघड फायदा आहे. कार्यालयात जाऊन काम करण्यात अनेक प्रकार अंतर्भूत असतात. मिटिंग (बैठक), संवाद, संघभावनेची वृद्धी, भावनिक नातेसंबंध अशा अनेक मुद्द्यांचा त्यात समावेश असतो. प्रत्येक कार्यपद्धतीचे फायदे तोटे असतात. तसंच ‘वर्क फ्रॉम होम’ संकल्पनेचं आहे. पण येण्या-जाण्यात होणारा वेळेचा अपव्यय टाळल्याने जास्त काळ काम करता येतं हा या संकल्पनेचा उघड फायदा आहे. उद्योगजगताला घरून काम करण्याच्या वातावरणाचे सकारात्मक परिणाम  दिसू लागल्याने आता ‘होममेकर्स’ (गृहिणी)नाही नव्या करिअरसंधी मिळू शकतील. कार्यालयात जाऊन काम करण्याच्या प्रक्रियेत अनेक प्रकार अंतर्भूत असतात. मिटिंग (बैठक), संवाद, संघभावनेची वृद्धी, भावनिक नातेसंबंध अशा अनेक मुद्द्यांचा त्यात समावेश असतो.

‘वर्क फ्रॉम होम’ या संकल्पनेद्वारे काम करता यावं यासाठी घरात एकांत (प्रायव्हसी) असणं अत्यावश्यक आहे. घराचा एक भाग ऑफिस मानणं जमलं तर फारच छान.  ऑफिसमध्ये असते तशी टेबल, खुर्चीची व्यवस्था तिथे करा. तुम्ही घरी असलात तरी ऑफिसचं काम करताय, याची कल्पना  घरातल्या सर्व सदस्यांना द्या. तुम्ही कोणत्या वेळेत ऑफिसचं काम करणार आहात याचं वेळापत्रक तयार करा. एखादा फलक करून त्यावर हे दर्शवता आलं तर आणखी उत्तम. या कार्यपद्धतीत व्हिडीओ कॉलिंग हा एक महत्वाचा भाग असतो. यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. त्यामुळे चांगलं (वेगवान) इंटरनेट कनेक्शन (वायफाय), स्पीकर्स, इअरफोन आणि अधिकृत सॉफ्टवेअर संगणकावर उपलब्ध असणं अपेक्षित आहे. आपल्या ऑफिसचा फोनकॉल सुरू असताना मुलांनी कसं वागणं अपेक्षित आहे हे त्यांना समजवा.

या कार्यपद्धतीत व्हिडीओ कॉलिंग हा एक महत्वाचा भाग आहे. यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. ऑफिसचा फोनकॉल सुरू असताना मुलांनी कसं वागणं अपेक्षित आहे हेदेखील त्यांना समजवा. यासाठी  शक्यतो तुमच्या चेहर्‍यावर प्रकाश येईल अशी जागा निवडा. अनेक व्हिडीओ कॉलिंग सॉफ्टवेअर्समध्ये बॅकग्राऊंड चित्रांचा पर्याय उपलब्ध असतो. त्यापैकी प्रसन्न चित्र निवडा. शक्यतो आपल्या खोलीतला टीव्ही, रेडिओ आदी आवाज करणारी उपकरणं बंद करा. कॉल चालू असताना व्हिडीओ ऑप्शन सुरू ठेवावा आणि ऑडिओ माईक बंद ठेवावा. तसंच याबाबतच्या मिटिंग होस्टने दिलेल्या सूचना पाळाव्यात. आपल्याला एखादा मुद्दा मांडायचा असल्यास बोट वर करावं अथवा चिन्हाचा वापर करावा. म्हणजे तुम्हाला बोलायचं आहे हे इतरांना कळेल. सर्व डिजिटल उपकरणांच्या बॅटरीज रात्रीच पूर्ण चार्ज करून ठेवा. या संस्कृतीसाठी स्मार्ट सवयीही अंगीकारणं गरजेचं आहे. आता या सवयी नेमकेपणाने तपासून पाहू.

 स्मार्ट कपडे :  घरून काम करायचं, म्हणजे घरच्या कपड्यांवर राहिलं तरी चालेल, हा विचार टाळा. घरून काम करायचं असलं तरी नीटनेटके कपडे घातल्याने मन प्रफुल्लीत होतंच शिवाय आपल्याला ऑफिसचं काम सुरू करण्यासाठी मानसिकरीत्या तयार व्हायला मदत होते. आपल्या कंपनीच्या संस्कृतीप्रमाणे   फॉर्मल किंवा स्मार्ट कॅज्युअल कपडे घालणं संयुक्तिक ठरेल. नीटनेटके कपडे घातल्याने घरातून बाहेर पडायचंय, अशी  जाणीव मेंदूला होते. त्याचप्रमाणे काम संपल्यानंतर कपडे बदलले की आजचं काम संपलं, ही भावना जाणवते.

शिस्त - घरून काम करत असलात तरी तुम्ही ऑफिसला पोहोचता, त्याच वेळी कामाला सुरुवात करा आणि ऑफिसची वेळ संपते तेव्हा काम थांबवा. रात्री फार वेळ जागरण करू नका आणि रोजच्या झोपेच्या वेळी झोपा. म्हणजे दुसर्‍या दिवशी काम सुरु करण्यासाठी मेंदूला पुरेसा आराम मिळालेला असेल. कामाचे तास संपले की तुमचा कॉम्प्युटर लॉग आउट करा आणि काम थांबवा. घरी संगणकावर काम करत असाल तर की पॅड नीट हाताळता येईल, एवढ्या खुर्चीची उंची असायला हवी. अन्यथा, सांधेदुखी, पाठदुखी असे त्रास होऊ शकतात

मोकळ्या हवेत फेरफटका मारा - घरून काम करण्याचा अर्थ स्वतःला घरात कोंडून घेणं, असा होत नाही. कामातून आणि स्क्रीनमधून ब्रेक घेण्यासाठी ताठ उभं राहणं, स्ट्रेचिंग करणं, इतकंच नाही तर एखादी फेरी मारून येणंही महत्वाचं आहे. हा फेरफटका तुम्ही स्वतःसाठी मारता. त्यामुळे मानसिक ताण कमी होतोच शिवाय मन प्रफुल्लित होतं. यावेळी काही लोक भेटतात. तुमची उत्पादकता वाढायला हे उपयोगी पडतं

 गप्पाटप्पा - ऑफिसमध्ये तुम्ही सहकार्‍यांशी गप्पा मारता. थोडंफार हसणं, खिदळणं होतं. मात्र, घरून काम करताना तुम्ही एकटे असता. संपूर्ण दिवस कुणाशीही न बोलता काम म्हणजे एक प्रकारचा तुरुंगवासच. या एकाकीपणातून बाहेर पडायचा एक मार्ग म्हणजे  थेट कॉल करून गप्पा मारा. आपल्या घरातल्या इतर कुटुंबियांशीही बोला. त्यांना ऑफिसमधल्या गमती जमती सांगा.

छोटे-छोटे ब्रेक घ्या - घरून काम करताना नित्यक्रम ठरलेला असावा. पण घरून  काम करणं कंटाळवाणं होता कामा नये. यासाठी रामबाण उपाय म्हणजे कामाच्या मध्ये छोटे-छोटे ब्रेक घ्या. ऑफिसमध्ये जसा थोडा फेरफटका मारता तसा घरी मारा. घरून काम करणारे अनेकजण ‘पोमोडोरो तंत्रा’चा प्रभावी वापर करतात. पोमोडोरो हे वेळेचं व्यवस्थापन करण्याचं एक तंत्र आहे. यात कामाचे तास 25 मिनिटांच्या भागात विभागून प्रत्येक 25 मिनिटांनंतर पाच मिनिटांचा छोटा ब्रेक घ्यायला सांगितलं आहे.

चर्चेची पूर्वतयारी- प्रत्यक्ष भेटीत आपण निवांतपणे बोलतो, माणूस समोरच असल्याने एखादी बाब नेमक्या वेळी आठवली नाही तरी काही वेळाने बोलण्याची सोय असते. अनेकदा एखाद्या मुद्द्याचं आकलन उशिरा होतं, विषयाची चर्चा करताना न जाणवणारी बाब काही वेळाने जाणवली तरी शंकेचं निराकरण करुन घेता येतं. ‘वर्क फ्रॉम होम’ पध्दतीत कार्यालयीन सहकार्‍यांबरोबर फोन, व्हिडिओ कॉल किंवा वेबिनारमध्ये काम करताना अनेकदा महत्वाचे मुद्दे मागे राहण्याची शक्यता असते. काही मुद्द्यांचा उलगडा नंतर होतो आणि करावयाच्या कामासंदर्भात काही प्रश्‍न निर्माण होतात. तोपर्यंत चर्चा मात्र संपलेली असते. फोनकॉल किंवा वेबिनार संपलेला असतो. अशा वेळी आपले प्रश्‍न नव्याने विचारायची सोय रहात नाही. म्हणूनच सुरुवातीच्या टप्प्यातच आपल्या प्रश्‍नांची, नंतर उपस्थित होऊ शकणार्‍या मुद्द्यांची चाचपणी करुन घ्यावी. आपल्याला उपस्थित करावयाचे मुद्दे लिहून घ्यावेत आणि नेमक्या टप्प्यावर सहकार्‍यांशी बोलून घ्यावेत. यामुळे नंतर उपस्थित होणार्‍या प्रश्‍नांची आधीच दखल घेता येते आणि एखाद्या मुद्द्याबाबत साशंक रहावं लागत नाही. एकंदरीत, बैठकीतल्या प्रश्‍नांबाबत किंवा कार्यालयीन प्रक्रियेबाबत सजग राहण्याची गरज घरुन काम करताना अधिक जाणवते.

   वशशरिज्ञऽवशशरिज्ञीहळज्ञर्रीिीी.लेा

(लेखक उद्योजक व संगणक साक्षरता प्रसारक आहेत.)