मराठी भाषेविषयीची तळमख व आगरीभाषेविषयी असणारे ममत्य,प्रेम,आपुलकी व आस्था असे आगरी समाजातील जुने जाणते प्रतिथयश साहित्यिक म्हणजे म.ना पाटील व प्रा. शंकर सखाराम या सर्वाच्या बरोबरीने चपखलपणे बसणा-या उत्तम साहित्यिका म्हणजे प्रा. वासती ठाकूर. आगरी भाषा आगरी बोली आगरी संस्कृतीविषयी असणारी कळकळ जाणीव याचे माहेरघर म्हणजे वासंती ठाकूर त्यांचे आगरी भाषेवर नितांत प्रेम होते. आगरी समाज हा आपला समाज आहे. हा समाज दुर्लक्षिला जाऊ नये या समाजाची उपेक्षा होऊ नये म्हणून त्या नेहमी जागरुक असत. समाजातील चालीरीती पारंपारिक प्रथा नेहमी चालू राहाव्यात म्हणून त्या प्रयत्नशिल असत. अशा या समाजाला मान्य असणा-या प्रथांचे जतन व्हावे असे त्यांना मनोमन वाटत असे. आगरी समाजाची अस्मिता वाढावी या समाजाला प्रतिष्ठा मिळावी म्हणून त्यांची सतत धडपड असे. समाजाची सेवा करणे समाजाचे व्रत अंगीकारणे हा त्यांचा उपजत गुणधर्म होता. सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमात जेव्हा त्यांना बोलण्याची संधी मिळत असे तेव्हा त्या आपले विचार मांडताना आगरी संस्कृतीविषयी मनमोकळेपणाने अगदी भरभरुन बोलत असत.

एक उत्तम शिक्षिका नोकरी करीत असताना त्यांनी आपले लेखन चालु ठेवले. त्यांचे लेखन सेवेत कादंबरी,कथा संग्रह, कवितासंग्रह एकांकिका नियतकालिके व दिवाळी अंकात केलेले विपुल लेखन यांचा समावेश आहे. त्याचा पहिला कथासंग्रह सन 1999 साली प्रकाशित झाला. त्यांचे नाव गजरा, या कथासंग्रहातील सर्वकथा आपल्याशा वाटणा-या व लोकप्रिय आहेत. पुढे त्यांनी तुळसमंजिरी उफल्या घरटं भातुकलीचा खेळ महाराष्ट्र तितुका मेळवावा अशा पुस्तकांचे लेखन केले. या सर्व पुस्तकांत उफल्या हा त्यांचा लघुाआत्मचरित्र समाजमनाला खूप भावला यात त्यांनी आधुनिकरणाचे ग्रामसंस्कृतीवर होणा-या अतिक्रमणाचे उत्तम दर्शन घडविले आहे. प्रामुख्याने या आधुनिकरणामुळे शहराच्या आसपासच्या सानिध्यातील गावांचा चेहरामोहरा कसा बदलला प्राचीन परंपरा रितीरिवाज ग्रामिण संस्कृती अशा सर्व गोष्टींचा काळाच्या ओघात झालेला असंगत, ग्रामीणजीवनातील अनेक गोष्टी ग्रामीणजीवनाला कशा ग्रासू पाहता आहेत. भूमिपुत्रांना नव्या समस्यांना कसे तोंड द्यावे लागत आहे. त्यांना समोर आलेल्या परिस्थितीला कसे सामोर जावे लागत आहे. याबाबत यथोचित विवेचन केले आहे. या लघुकांदबरीत प्रकल्पग्रस्त समाज जीवनाची कथा व व्यथा मांडण्याचा वास्तवादी प्रयत्न केला आहे. या कादंबरीची निमिती जे.एन.पी.टी प्रकल्पग्रस्त लोकांना समाजाला लागलेली झळ या जाणिवेने केली आहे. या लघुकांदबरीत त्यांचे अष्टपैलू लेखनाचे खास लेखनशैलीत असलेले एका विशाल वाडमयाचे दर्शन दिसून येते. आगरी संस्कृतीतील पांरपारिक गीते धवला गाणी येणा-या पुढील पिढीस सिदोरी म्हणून संग्रही राहवी याकरीता त्यांची भावसौदर्य हे पुस्तक प्रकाशीत केले.

ऊासंती ठाकूर या एक व्रतस्थ समाजसेविका व्यांसगी कुशल संपादीका परिवर्तनवादी कर्तृत्वान महिला म्हणून प्रसिध्द आहेत. त्यानी आगरी दपर्ण या मासिकाच्या सहसंपादिका व आर्दश अग्रसेन या मासिकाच्या संपादक म्हणून अखेरपर्यत कार्य केले. तसेच त्यांनी अत्रे कट्टा उरण यांचे अध्यक्षा म्हणून काम पाहिले त्यांचे इतक्या वर्षाच्या साहित्य प्रवासात सुमारे 25 पुरस्काराने त्यांना सन्मानीत करण्यात आले आहे. तसेच पर्यावरण मित्र म्हणून त्यांचा शासनाने यथोचित गौरव केला आहे. आगरी संस्कृतीवषयी नितांत आदर बाळगणा-या व लोकसंस्कृतीला उतुंग गवसणी घालणा-या चतुरस्त्र शा ज्येष्ठ साहित्यितीका काळाच्या पडद्या आड निघून गेल्या या धडाडीच्या प्रतिथयश मनस्वीनीला माझा अखेरचा शतशः दंडवत.

डॉ. जगदिश शांताराम थळे  मु कोपर ता. अलिबाग मो 7588309125

 

अवश्य वाचा