लोकजनशक्ती पक्षाचे नेते व केंद्रीय अन्, नागरी पुरवठा मंञी रामविसास पासवान यांचे हृदय विकाराने निधन झाल्याने आणीबाणीच्या काळात तुरुंगात गेलेल्या पिढीतील एक महत्वाचा दलितांचा नेता काळाच्या पडद्याआड गेला आहे. तसे त्यांचे नेतृत्व हे बिहारच्या काही भागापुरतेच मर्यादीत राहिले होते. त्यांच्या मनात आपण दलितांचे राष्टीय पुढारी व्हावे अशी इच्छा असली तरी ती कधीच पूर्ण झाली नाही. गेल्या 50 वर्षाच्या राजकीय वाटचालीत त्यांनी अनेक राजकीय चढउतार पाहिले. माञ आपण सत्तेच्या केंद्रस्थानी कसे राहू हे माञ आवर्जुन पाहिले. त्यामुळे सरकार कोणाचेही म्हणजे काँग्रेस किंवा भाजपा आघाडीचे असो पासवान यांची वर्णी लागायचीच. मंञिमंडळाळील दलित मंञ्याची जागा त्यांच्याकडून भरुन काढली जात होती. थोडक्यात सांगावयाचे तर महाराष्टातील नारायण आठवलेंची आठवण त्यांचा राजकीय आलेख पाहून येई. 2014 सालापासून ते मोदींच्या मंञिमंडळात होते. माञ त्यांनी 2019 सालची लोकसभा लढविली नव्हती. त्याएवजी आपल्या भावाला जागा सोडली होती. परंतु त्यांनी आपला वारस म्हणून मुलगा चिराग याला निवडले होते. लोकजनशक्ती पक्षाची धुरा तो गेली दोन वर्षे सांभाळत आहे. पासवान यांनी लोकसभा लढविली नसली तरी त्यांनी भाजपा व संयुक्त जनता दल यांच्या सहकार्‍याने राज्यसभेवर वर्णी लावली होती. त्यामुळे त्यांना पुन्हा 19 मध्ये मंञी होता आले. गुजरात दंगलीनंतर केंद्रातील वाजपेयी सरकारमधून बाहेर पडलेले पासवान पुढे त्यांच्याच नेतृत्वाखालील मंञिमंडळात सामिल झाले होते. त्यांनी सत्ता मिळविणे हे राजकारणाचे केंद्रस्थान निश्‍चित केले होते व त्यानुसार ते आपल्या राजकारणाची दिशा बदलत. दलितांचे प्रश्‍न व त्याच्या जोडीला पूर्वाश्रमीची समाजवादी विचारसारणीची पार्श्‍वभूमी याचा त्यांच्या महत्वाकांक्षेत कधी अडसर ठरला नाही. त्यामुळे लालूप्रसाद यादव त्यांना हवामान शास्ञञ म्हणत. ते एका अर्थाने खरेच होते. त्यामुळेच सहा पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली त्यांनी मंञिमंडळात काम केले. लालूप्रसाद यादव, नितीशकुमार, रामविलास पासवान हे तिघेही नेते आणीबाणीच्या लढ्यातून जन्माला आले. यातील लालू वगळता दोघांनी भाजपासारख्या जातियवादी पक्षाशी तडजोड करुन आपले राजकारण टिकविले. लालूंनी माञ ही तडजोड केली नाही त्यामुळे आज ते जेलमध्ये आहेत. यातील लालूंच्या भ्रष्टाचाराचे समर्थन करण्याचा प्रश्‍न येत नाही परंतु लालूंनी आपली विचारधारा काही सोडली नाही हे महत्वाचे. लालू जर भाजपासोबत गेले असते तर सध्या तुरुंगात नसते. असो, पासवान यांनी माञ सत्तेसाठी तडजोडी केल्या. 80 च्या दशकात महाराष्टात असलेल्या आक्रमक दलित पँथरपासून बोध घेत पासवान यांनी 83 साली बिहारमध्ये दलित सेना स्थापन केली. त्यापूर्वी त्यांची निवड राज्यातील नागरी सेवेत झाली होती. पासवान यांच्या वडिलांच्या आग्रहावरुन त्यांनी ही परीक्षा दिली खरी परंतु त्यांना सरकारी नोकरी करण्यात काही रस नव्हता. त्यामुळे त्यांनी नोकरी सोडली व ते राजकारणात उतरले. समाजवादी विचारसारणीकडे तरुणपणात प्रभावी झालेले पासवान हे काँग्रेसचे कट्टर विरोधक होते. त्यातून त्यांना आणीबाणीत अटक झाली आणि त्यांच्या नेतृत्वाला उभारी आली. संयुक्त समाजवादी पक्षातर्फे पासवान बिहारच्या विधानसभेवर 69 साली निवडून आले. परंतु त्यानंतर आलेल्या आणीबाणीने जे देशाला अनेक हिरो दिले त्यात पासवान अग्रभागी होते. आणीबाणी उठविल्यावर निवडणुका झाल्या व त्यात पासवान जनता पार्टीचे उमेदवार म्हणून सर्वात प्रथम लोकसभेवर निवडून गेले. बिहारमधील हाजीपूर लोकसभा मतदारसंघातून चार लाख मताधिक्याने ते विजयी झाले होते. त्यांच्या या विजयाने ते राष्टीय स्तरावरचे नेते झाले. त्यानंतर त्यांचा सलग आठ वेळा लोकसभेवर निवडून गेले. 89 साली व्ही.पी. सिंग यांच्या मंञिमंडळात सर्वात प्रथम मंञी झाले व त्यानंतर कोणत्याही पक्षाचे सरकार येओ त्यांचे मंञिपद कायम होते. त्यानंतर ते वाजपेयींच्या सरकारमध्ये सामील झाले व ते सरकार गेल्यावर काँग्रेस आघाडीतही सामिल झाले. त्यानंतर मोदी सरकार आल्यावर त्यांच्यातही मिसळले. 2014 साली राजकीय बदलाचे वारे अचूकपणे हेरत त्यांनी काँग्रेस आघाडीची साथ सोडत भाजपासोबत घरोबा केला. सत्तेसाठी अशा प्रकारे त्यांनी समझोता सतत केल्याने त्यांचा जनाधार गेल्या काही वर्षात कमी झाला होता. 2000 साली त्यांनी लोकदलाला रामराम करीत स्वतचा स्वतंञ पक्ष लोकजनशक्ती स्थापन केला. परंतु त्यांची वाढ देशात सोडून द्या सर्व बिहारमध्येही झाली नाही. जगजीवनराम यांच्या निधनानंतर बिहारमधील दलिल नेतृत्वाची पोकळी त्यांनी भरुन काढली असली तरी त्यांना सर्वच दलितांचा नव्हता हे देखील तेवढेच खरे आहे. गेल्या दोन वर्षात त्यांची प्रकृती त्यांना काही साथ देत नव्हती. त्यामुळे त्यांनी आपल्या पक्षाचे नेतृत्व चिराग पासवानकडे सुपूर्द केले होते. यंदाच्या बिहार निवडणुकीतही स्वबळावर जाण्याचा निर्णयही चिराग यांनी भाजपाच्या दबावाखाली घेतल्याची चर्चा होती. आता निवडणुकीच्या तोंडावर पासवान यांच्या जाण्याने लोकजनशक्ती पक्षाला काही फायदा मिळतो का ते पहावे लागेल. पासवान यांच्या पश्‍चात आता पक्ष वाढविण्याची कसोटी चिराग यांना द्यावी लागेल. याची पहिली कसोटी बिहारच्या विधासभा निवडणुकीत लागेल. पासवान हे सतत तडजोडीचे राजकारण करणारे दलित नेतृत्व होते अशी त्यांची प्रतिमा होती. त्यांची पुढील पिढी काय करते ते पहावे लागेल.