Tuesday, January 26, 2021 | 08:51 PM

संपादकीय

लोकशाहीचा आत्मा जपावा

भारतीय लोकशाहीच्या दृष्टीने तीन तारखा अत्यंत महत्त्वाच्या आहेत

भारतीय संस्कृतीतील एक सण - मकरसंक्रात
रायगड
13-Jan-2021 06:56 PM

रायगड

मकर संक्रांत हा भारतातील पौष महिन्यात येणारा एक शेती संबंधित सण आहे. सौर कालगणनेशी संबंधित असा हा महत्त्वाचा भारतीय सण आहे. भारतीय संस्कृती ही कृषी संस्कृती आहे. या दिवसांमध्ये शेतांत आणि मळ्यांमध्ये आलेल्या धान्याचे वाण एकमेकांना स्त्रिया देतात. हरभरे, ऊस, बोरे, गव्हाची ओंबी, तीळ अशा गोष्टी सुगडात भरून त्या देवाला अर्पण करतात. बायका उखाणे घेतात. हा सण जानेवारी महिन्यात व हिंदू पंचांगाप्रमाणे पौष महिन्यात येतो. संक्रांत ही एक देवता मानली गेली असून, प्रतिवर्षी ती येताना वेगवेगळ्या वाहनावर बसून येते अशी समजूत प्रचलित आहे. कधी तिचे वाहन हत्ती, कधी गाढव तर कधी डुक्कर असते आपल्या महाराष्ट्रात प्रत्येक सण साजरा होतांना अतिशय उत्साह, आनंद, एकमेकांना मानसन्मान देण्याची पद्धत, रुढी परंपरा यांना फार महत्त्व दिल्याचं आपण पाहतो. या परंपरा सुरु झाल्या त्यामागे देखील पुर्वजांचा एक चांगला हेतू असल्याचे लक्षात येते.

मकरसंक्रात सणापूर्वी वातावरणात असतो तो कमालीचा गारठा. प्रत्येक सजीवाला या थंडीची हुडहुडी फार गारेगार करून सोडते. कधी एकदा सुर्य तापतोय आणि ही थंडी कमी होते असे प्रत्येकाला वाटते.आणि हा सुर्यदेव तापायलाच तयार नसतो! मकर संक्रांत भारताच्या विविध राज्यात विविध नावाने आणि विविध पद्धतीने साजरी केली जाते जसे मकरसंक्रात  (महाराष्ट्र), पोंगल (तामिळनाडू), उत्तरायण (गुजरात व राजस्थान),  लोहढी (पंजाब), माघमेला (ओडिसा), भोगाली बिहु -  (आसाम), संक्रांती  (कर्नाटक, केरळ, आंध्रप्रदेश, बिहार) अशी विविध नावं या सणाला आहेत. प्रत्येक धर्म आपापल्या प्रथांप्रमाणे या दिवसाला साजरा करत असले तरी देखील आनंद, उत्साह, जल्लोष हा सगळीकडे असतोच असतो. मकरसंक्रांत या सणाचे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे हा सण कायम 14 जानेवारीलाच येतो (कधीतरी या सणाला 13 जानेवारी किंवा 15 जानेवारीला आल्याचे आपण पाहातो पण ही अपवादात्मक स्थिती सोडल्यास हा उत्सव नेहमी 14 जानेवारीला येतो)पौष महिन्यात जेव्हां सुर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा हा उत्सव सर्वत्र संपन्न करण्याची परंपरा आहे. हा भारतीय सण सौर कालगणनेशी संबंधीत अतिशय महत्त्वाचा सण असून शेतीशी देखील संबंधीत आहे. मकरसंक्रांतीपासून हळुहळु दिवस मोठा होत जातो आणि रात्र लहान होत जाते. सुर्याची तीव्रता दाहकतेत बदलत पुढेपुढे सरकायला लागते आणि साधारण 10 ते 15 दिवसांच्या अंतराने रथसप्तमी असते (मकरसंक्रांतीपासून ते रथसप्तमी पर्यंत अनेक सुवासिनी हळदीकुंकवाचे आयोजन करतात.)

असं म्हणतात की,या रथसप्तमीपासून सुर्याच्या रथाला घोडे लागतात आणि सुर्यदेव चांगलेच मनावर घेतल्याप्रमाणे आग ओकायला (तापायला) सुरूवात करतात. मकरसंक्रांतीला सुवासिनी एकमेकींना सुगड्याचे वाण देतात. या वाणात हरभरे,मटार, बोरं, उस, गहु, तीळ, नाणे, असल्याचे आपण पाहातो. (हरभरे, मटार, बोरं, गव्हाच्या ओंब्या या दिवसांमध्येच विपुल प्रमाणात उपलब्ध असल्याने वाणात त्याचा समावेश आपल्याला पहायला मिळतो).ऊस, हरभरे,बोरं, गव्हाच्या ओंब्या, तीळ सुगड्यात भरुन हे वाण महिला वर्ग ज्यापद्धतीने एकमेकींना देतं त्याचप्रमाणे पंढरपुरच्या रुक्मिणीला देखील सवाष्ण स्त्रिया आजच्या दिवशी हे वाण देण्याकरिता गर्दी करतांना दिसून येतात. मकरसंक्रांतीला काळे कपडे घालण्याची,एकमेकांना देण्याची देखील प्रथा आहे. तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला, असं म्हणण्याची संधी आपल्याला केवळ या सणालाच मिळते बरं कां!

तिळ आणि गुळ हे उष्ण असल्याने या थंडीच्या मौसमात आपल्या शरीरात आवश्यक उष्णतेची गरज तिळगुळ पुर्ण करतं आणि याच मुख्य कारणामुळे मकरसंक्रांतीला तिळगुळ देण्याची परंपरा सुरू झाली असावी. नवे लग्न झालेल्या नववधुचे हळदीकुंकु या दिवसांमध्ये पहिल्यांदा मोठ्या प्रमाणात हौसेने करतांना आपण पाहातो. याकरता तीच्यासाठी काळी साडी,हलव्याचे दागिने (नव्या नवरदेवाला देखील हलव्याचे दागिने घालतात) विविध आभूषणं घालून तिला सजविले जाते. कोणताही सण आपल्याला आनंद, उत्साह, नवचैतन्य, देण्याकरिताच येत असतो. रोजच्या दैनंदिन आयुष्यातल्या घडामोडींपासून चार क्षण निवांत काढून आपण देखील सणाचा हा अंगिकारतो त्यात रममाण होतो,भेटीगाठी होतात आणि या सण उत्सवापासून मिळालेली उर्जा पुढे कित्येक दिवस आपल्याला रोजच्या दिनक्रमात जगण्याकरता उपयोगालायेते!आणिम्हणूनआपण प्रत्येक सण उत्साहाने,आनंदाने जगावयास हवा तरच आपल्या जीवनामध्ये उत्कर्षाची पहाट उजाडेल! 

 

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top