जेएनपीटी   

 एका दुध डेअरी मालकाने खंडणी देण्यास नकार दिलेल्या रागातून फायरींग केल्याची घटना उलवे नोड येथे रविवारी  घडली. या प्रकरणात एका यु-ट्यूब चॅनलच्या पत्रकाराला अटक करण्यात आली आहे. आशिष दिनकर चौधरी (52) असे या आरोपीचे नाव आहे. सोमवार दि 28रोजी पोलिसानी त्याला अटक केली असून न्यायालयाने त्याला गुरूवार दि1 ऑक्टोबर पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

  पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहिती नुसार या कथित पत्रकाराने तुम्ही लॉकडाऊनचे नियम पाळत नसून याबाबत तुमची मीमाझ्या यु-ट्यूब चॅनलवर बातमी प्रसिद्ध करीन आणि तुमची डेअरी बंद करीन अशी धमकी देवून दोन हजार रूपये खंडणीची मागणी केली. मात्र खंडणी देण्यास नकार दिल्यानंतर आरोपीने या डेअरी समोर आपल्या जवळील अग्निशस्राने गोळीबार केला आणि दहशत माजविण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी शैलेंद्रकुमार रामसजन यादव रा. साई नक्षत्र बिल्डींग, उलवे नोड सेक्टर-18 यांनी न्हावाशेवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केल्यानंतर आरोपीला ताबडतोब अटक करण्यात आली आहे. आरोपी आशिष चौधरी याला न्यायालयाने गुरूवार पर्यंत पोलिस कोठडी ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. न्हावाशेवा पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक प्रमोद जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अधिक तपास करत आहेत.

अवश्य वाचा