पाली/ वाघोशी

    कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर विविध धबधबे आणि पर्यटन स्थळांवर जाण्यास बंदी आहे. मात्र काही हौशी पर्यटक सुधागड तालुक्यातील आंबिवली धबधब्यावर मौजमजा करण्यासाठी येत होते. पाली पोलीस निरीक्षक बाळा कुंभार यांच्या निर्देशाने रविवारी (ता.12) पोलिसांनी आंबिवली धबधब्यावर आलेल्या पर्यटकांवर कारवाई केली. अशा प्रकारे पुन्हा जर कोणी कुठेही आढळल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक बाळा कुंभार यांनी दिली.

    सुधागड तालुक्यातील उन्हेरे, कवेले, घोटवडे, कोंडगाव व ढोकशेत हे पाचही धरण व तेथील परिसर, उन्हेरे गरम पाण्याचे कुंड, पडसरे, घपकी व भार्जेयासह इतरही धबधब्यांवर आणि सर्व पर्यटन स्थळांवर पावसाळी पर्यटनास सक्त बंदी आहे. याचबरोबर फार्महाऊसवर आलेल्यांना देखील मौजमस्ती करण्यासाठी जाण्यास बंदी आहे. असे करतांना जर कोणी आढळल्यास त्यावर सक्त कायदेशीर कारवाई केली जाईल अशी माहिती तहसीलदार दिलीप रायन्नावार यांनी दिली.

अवश्य वाचा