पेण

 पेण नगरपालिकेच्या मुख्याधिकारी अर्चना दिवे यांच्यावर स्थायी समितीच्या बैठकीमध्ये आमदार रविंद्र पाटील यांचे चिरंजीव नगरसेवक अनिरूध्द पाटील यांनी दोन वेळा खुर्ची उचलुन मारण्यासाठी अंगावर धावून गेल्याचा प्रकार झाला असून याबाबत पेण पोलिस ठाण्यात भादवी कलम 353, 352, 506 प्रमाणे गुन्हा दाखल झाला असून गुन्हयातील आरोपी अनिरूध्द रविंद्र पाटील हा फरार असल्याचा पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीवरून समजते.

या अगोदर 7 वर्षापुर्वी देखील हाच प्रकार घडला होता कि तत्कालीन नगरसेवकाच्या मुलांनी मुख्याधिकारी विजयकुमार द्वासे यांना युनिक बाजारच्या पार्कींगमध्ये बेदम मारहाण केली होती. हा प्रकार तर समस्त पेणकरांनी पाहिला होता. आणि  शुक्रवारी  अनिरूध्द पाटील याने  सभागृहात मुख्याधिकार्‍यांच्या अंगावर खुर्ची उचलून मारण्यासाठी धावून गेल्याचा प्रकार घडला. हा सर्व प्रकार स्थायी समितीच्या बैठकीसाठी उपस्थित असणार्‍या कर्मचार्‍यांनी पाहिला आहे. तसेच स्थायी समितीच्या बैठकीसाठी उपस्थित असलेल्या महिला सभापतीनेदेखील हा घृणास्पद प्रकार उघडया डोळयांनी पाहिला.

  या आगोदर अनिरूध्द पाटलांविरूध्द प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना दमदाटी केल्याचादेखील गुन्हा दाखल आहे. पेण पोलिस ठाण्यात सदर आरोपीच्या अटकेबाबत विचारणा केली असता काल रात्री पासून आरोपीचा शोध घेत आहोत परंतु आरोपी सापडलेला नाही(फरार आहे), असे सांगण्यात आले.

अवश्य वाचा

गर्भातील बाळाला दिले रक्त