महाड 

मुंबईमध्ये गर्भवती पत्नीला कोरोना संसर्ग झाल्या नंतर रुग्णालयांमध्ये उपचार न घेता तसेच होम क्वारंटाईन न होता आपल्या गर्भवती पत्नीसह मुंबईहून मोटार सायकल ने महाड तालुक्यांतील करमर गाव गाठणाछया या दांपत्यावर अखेर महाड तालुका पोलिस ठाण्या मध्ये गुन्हा दाखल करण्यांत आला. सरकारी आदेशाचे उल्लंघन आणि साथरोग अधिनियमा प्रमाणे हा गुन्हा दाखल करण्यांत आला असल्याचे पोलिसांनी सांगितले.

किल्ले रायगडाच्या पायथ्या पासुन दहा किलो मिटर अंतरावर असलेल्या करमर या गावांतील हे दांपत्य असुन या दांपत्यावर मुंबईतील सोमया रुग्णालयामध्ये कोरोनाचे उपचार करण्यांत येत होते.त्यांना अधिक उपचाराची आवश्यकता होती,त्या मुळे दि.18 मे रोजी सोमया रुग्णालयांतुन डिस्चार्ज देताना केइएम विैंवा सायन रुग्णालयामध्ये उपचार करुन घ्यावेंत असे सांगण्यांत आले.परंतु या दांपत्याने मुंबई मध्ये उपचार न घेता थेट मोटार सायकल वरुन महाड तालुक्यांतील करमर हे आपले गाव गाठले.

आपल्या गावांतील मुंबईत रहात असलेले हे दांपत्य गावाकडे आल्या नंतर त्यांना सर्व प्रकार समजला.ग्रामस्थांनी त्वरीत आरोग्य आणि पोलिस यंत्रणेला कळविले.पोलिसांनी पती आणि गर्भवती महिला यांना ताब्यांत घेऊन महाड ग्रामिण रुग्णालयाच्या कोरोना उपचार वेैंद्रा मध्ये  दाखल केले.या दांपत्यावर तालुका पोलिस ठाण्या मध्ये गुन्हा दाखल करण्यांत आला असुन पुढील तपास पोलिस करीत आहेंत.

अवश्य वाचा

आज पासून नवी सुरुवात!