Wednesday, December 02, 2020 | 01:54 AM

संपादकीय

शेतकर्‍यांचा एल्गार

राजधानी दिल्लीत कडाक्याच्या भर थंडीत शेतकर्‍यांनी घेराव घातल्याने......

कामोठेतील कुटुंबाचे मोबाईल हॅक
रायगड
31-Oct-2020 05:26 PM

रायगड

पनवेल 

अज्ञात हॅकरने कामोठे वसाहतीत राहणार्‍या एका कुटुंबियांचे सर्व मोबाईल फोन आणि दोन लॅपटॉप हॅक करुन त्याद्वारे त्यांच्या ओळखीच्या व्यक्तींना घाणेरडे मेसेज पाठवून सदर कुंटुंबाला शिविगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिल्याने कुटुंबा मध्ये भीतीचे वातावरण पसरले आहेत्यामुळे या कुटुंबाने कामोठे पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली आहे. कामोठे पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात आयटी ऍक्टसह धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करुन या प्रकरणाच्या तपासाला सुरुवात केली आहे.

कामोठे सेक्टर-19 मध्ये कुटुंबासह राहणार्या एका कुटुंबातील अज्ञात हॉकर्सने त्यांचा घरातील तिन्ही मोबाईल फोन व घरातील दोन्ही लॅपटॉप हॅक केले आहेत. तसेच हॅक करण्यात आलेल्या मोबाईल फोनवरुन त्यांच्या संपर्कातील व्यक्तीना त्यांच्या नकळत मेसेज पाठविण्यास सुरुवात केली आहे. हॅकरकडून त्यांच्या घरातील तिन्ही मोबाईलवर एकमेकांना तसेच मोबाईल मधील व्हॉट्सऍप, झुम मिटींग व गुगल मीट यासारख्या ऍफ्लिकेशन वरुन कुत्रा, इडीयट या सारखे मेसेजेस पाठविले जात आहेत. विशेष म्हणजे तक्रारदारांच्या दोन्ही मुलींचे ऑनलाईन क्लासेस सुरु असताना देखील त्यांच्या शिक्षकांना व मित्र मैत्रिणींना  देखील घाणेरडे मसेजे पाठविले जात आहेत. त्यामुळे सध्या हे संपुर्ण कुटुंब त्रस्त झाले आहे.  सुरुवातीला खबरदारीचा उपाय म्हणुन या कुटुंबाने सर्व मोबाईल फोन रिसेट मारले होते, तसेच फोन मधील सर्व अकाऊंट्सचे पासवर्ड बदलले होते. मात्र त्यानंतर देखील त्यांच्या मोबाईलवरुन घाणेरडे मेसेज जाण्याचे प्रकार सुरुच राहिले. त्याचप्रमाणे गुगल मीट व झुम मिटींगच्या ऍफ्सवरुन तक्रारदाराच्या मुलींच्या शिक्षकांना पैशाची मागणी होऊ लागली. तसेच तक्रारदारांना शिवीगाळ करुन त्यांना जिवे ठार मारण्याची धमकी देण्याचे प्रकार सुरु केले आहेत. मागील  दोन महिन्यापासून सुरु असलेल्या या प्रकारामुळे सदर कुटुंब गेल्या काही दिवसांपासून मानसिक दडपणाखाली आले आहे. त्यामुळे या कुटुंबाने कामोठे पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात आयटी ऍक्टसह धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करुन या प्रकरणाच्या तपासाला सुरुवात केली आहे.  विशेष म्हणजे या हॅकरकडून ऑनलाईन शिक्षण घेणाऱया सदर कुटुंबातील मुलींच्या शिक्षकांना सुद्धा गुगल मीट,जी सुट, झुम ऍपद्वारे धमकीचे मेसेज पाठवून या कुटुंबाची व त्यांच्या मुलींची बदनामी करण्यास सुरुवात केली आहे. कामोठे  पोलिसांनी या प्रकरणातील अज्ञात हॅकरविरोधात आयटी ऍक्टसह धमकी दिल्याप्रकरणी  गुन्हा दाखल करुन त्याचा शोध सुरु केला आहे.

 

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top