Wednesday, May 19, 2021 | 02:35 AM

संपादकीय

विज्ञान शिक्षणासाठी मराठी विद्यापीठ!

मराठी राजभाषा दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिन

घरफोड्या करणारी टोळी जेरबंद
रायगड
03-May-2021 09:49 PM

रायगड

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |

रायगड जिल्हा गुन्हे अन्वेषण विभागाने केलेल्या चौकशीत जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या तब्बल ११ घरफोड्यांच्या घटना उघडकीस आल्या आहेत. 

याप्रकरणी रायगड गुन्हे अन्वेषण विभागाने अभिषेक एकनाथ बटावले रा.उसरोली नांदगाव ता.मुरुड जि.रायगड 

मेहबूब हुसेन साटी सध्या रा.तळा मूळ रा.रायनमोटी ता.मांडवी कच्छ,गुजरात

मस्तान मोहम्मद राहटविलकर रा.मेट मोहल्ला,तळा जि.रायगड

रियाज हुसेन साटी रा.तळा मूळ रा.रायनमोटी ता.मांडवी कच्छ,गुजरात या चौघांना अटक केली आहे.

कोलाड पोलीस ठाण्याच्या हद्दीत वरसगाव ता.रोहा जि.रायगड या ठिकाणी झालेल्या घरफोडीच्या अनुषंगाने तपास करीत असताना अभिषेक एकनाथ बटावले रा.उसरोली नांदगाव ता.मुरुड जि.रायगड, मेहबूब हुसेन साठी सध्या रा.तळा, मस्तान मोहम्मद राहटविलकर रा.मेड मोहल्ला तळा यांच्याशी संगनमत करून  गुन्हा केला आपल्या चे कबूल केले.

या चारही आरोपींना न्यायालयाने पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. पोलीस कोठडी दरम्यान आरोपींची वेगवेगळी चौकशी केली असता त्यांनी मागील तीन ते चार महिन्याच्या कालावधीत रोहा, माणगाव, महाड, तळा आणि मुरुड या तालुक्यात खालील 11 गुन्हे केले असल्याची कबुली दिली.

या सर्व आरोपीच्या पोलीस कोठडी दरम्यान त्यांच्याकडून वरील 11 गुन्ह्यांमध्ये चोरीस गेलेली एकूण रुपये 4,38,228/- रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने, गृह उपयोगी वस्तू आणि एक मोटरसायकल असा एकूण 95 % मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच वरील आरोपींनी गुन्हे करण्याकरता वापरलेल्या दोन मोटारसायकल जप्त केल्या आहेत.

ही कामगिरी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांचे मागरदर्शन खाली सपोनि धनंजय पोरे, पोलीस उपनिरीक्षक महेश कदम, पोह. सचिन शेलार, प्रशांत दबडे, अमोल हंबीर, पोलस नाइक. प्रतीक सावंत, पो कॉ. विशाल आवळे, अनिल मोरे, अक्षय पाटील यांनी केली आहे.

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top