नेरळ 

कर्जत तालुक्याचे शेवटचे टोक असलेल्या पाषाणे ग्रामपंचायतमधील खडकवाडी येथील बांधकाम साईटवरील साहित्याची चोरी झाली होती. याबाबत डोंबिवली येथील बांधकाम व्यवसायिक यांनी नेरळ पोलीस ठाण्यात तक्रार केल्यानंतर सर्व आरोपींना मुद्देमालासह अटक केली आहे.

कर्जत तालुक्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या मौजे पाषाणे गावात खडकवाडी रोडला लागून कावेश्री प्रांगण नावाने बांधकाम सुरू आहे. इमारतीमध्ये तसेच कार्यालयातील एकूण 1,75,000 रुपये किमतीचा माल अज्ञात चोरांनी पळवून नेला होता. लॉकडाऊन कालावधीचा फायदा घेऊन घरफोडी झाली होती. चोरी करून चोरल्याची तक्रार दिल्याने नेरळ पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदरचा  गुन्हा दाखल होताच नेरळ पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी अविनाश पाटील यांनी गुन्ह्याचा तपासाची सूत्रे हातात घेऊन वरिष्ठांच्या सूचनांप्रमाणे पोलीस ठाणे कडील तपास पथक तयार करून तपास पथकास योग्य त्या सूचना दिल्या होत्या.  

तपास पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे गुन्ह्यातील आरोपी राजेश काळूराम माळी वय-30 वर्षे, रा.खाड्याचा पाडा, सुनील तुकाराम खाडे वय-41 वर्षे, रा.खाड्याचा पाडा, समीर मंगल पेमारे वय-28 वर्षे, रा.खाड्याचा पाडा, श्रीधर चंदर दिघे वय-50 वर्षे, रा.पाषाणे, प्रमोद दिलीप दिघे-22 वर्षे, रा.खाड्याचा पाडा यांना अटक केली. आरोपींकडून मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेली असुन अधिक तपास नेरळ पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अविनाश पाटील हे करीत आहेत. सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अशोक दुधे, अपर पोलीस अधिक्षक सचिन गुंजाळ यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक अनिल घेरडीकर, उपविभागीय पोलीस अधिकारी कर्जत विभाग यांचे मार्गदर्शनानुसार अविनाश पाटील सहायक पोलीस निरिक्षक नेरळ पोलीस ठाणे यांचे नेतृत्वाखाली नेरळ पोलीस ठाणे कडील सफौ गणेश गिरी, अविनाश वाघमारे, निलेश वाणी, शरद फरांदे यांचे पथकाने पार पाडली.

अवश्य वाचा

गर्भातील बाळाला दिले रक्त