उरण,

 लॉकडाऊनमध्ये  रेस्टॉरंट व बार उघडण्यास शासनाची बंदी असतानाही या आदेशाची पायमल्ली करून उरण शहरात सह्याद्री रेस्टॉरंट व बार सुरू ठेवल्या प्रकरणी उरण पोलिसांनी मालक अशोक महाबल शेट्टी यांच्यावर 3 े गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारवाई होऊनही बार सुरुच असल्याची माहिती शेजारील नागरिकांनी दिली.

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. त्यामुळे शासकीय पातळीवर इतर व्यवसाया बरोबर ज्यामुळे कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो ते व्यवसाय सुरू करण्यास मनाई आहे. त्यामध्ये रेस्टॉरंट व बारचाही समावेश आहे. वीर सावरकर मैदाना समोरील अशोक शेट्टी यांच्या मालकीचा सह्याद्री रेस्टॉरंट व बार सुरू असल्याची खबर उरण पोलिसांना लागताच त्यांनी बारवर धाड टाकली असता त्यांना रेस्टॉरंट व बार सुरू असल्याचे निदर्शनास आले.       पुढील तपास वपोनी जगदीश कुळकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सहपो निरीक्षक पवार हे करीत आहेत.

अवश्य वाचा