नेरळ 

कर्जत तालुक्यातील जांभूळवाडी येथील रहिवासी असलेल्या किशोर पाळू वारे या तरुणाचा 25 ऑगस्ट रोजी कंटेनर ने दिलेल्या धडकेत मृत्यू झाला.दुचाकीवरून घराकडे जात असताना पिंगळेवाडी येथे त्याच्या दुचाकीला मुरबाड कडून आलेल्या कंटेनरने दुचाकीला धडक दिली,त्यात किशोर वारे हा गंभीर जखमी झाला होता,आणि कशेळे ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत असताना त्याचे निधन झाले.

  तालुक्यातील वारे ग्रामपंचायत मधील जांभूळवाडी येथील रहिवासी असलेला किशोर वारे हा आपल्या दुचाकीवरून 25 ऑगस्ट रोजी सायंकाळी सात वाजण्याचे सुमारास घरी परतत होता.कशेळे येथून आपल्या घरी वारे जांभूळवाडी येथे जात होता.कर्जत-मुरबाड राष्ट्रीय महामार्ग वरील पिंगळेवाडी च्या वळणावर त्याच्या दुचाकीला समोरून आलेल्या कंटेनर ने धडक दिली.त्यात जखमी झाल्यावर स्थानिकांनी कशेळे ग्रामीण रुग्णालयात नेले,तेथे उपचार घेत असताना रात्री निधन झाले. याबद्दल कर्जत पोलीस ठाण्यात कंटेनर चालकावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.25 वर्षीय किशोर वारे याचे पदवी पर्यंत शिक्षण झाले होते आणि त्यांचे याच वर्षी लग्न झाले होते.त्यामुळे लहानवयात मृत्यू ओढवल्याने सर्वत्र दुःख व्यक्त करण्यात येत आहे.

 

अवश्य वाचा

गर्भातील बाळाला दिले रक्त