खोपोली,

 मुंबई-पुणे एक्सप्रेसवर ढेकू गावच्या हाद्दीत पुण्याहून मुंबईकडे जाणार्‍या रस्त्यावर ट्रेलर चालकांचा वेगावर नियंत्रण सुटल्याने एकामागोमाग एक अशा चार वाहनांना धडक दिल्याने या अपघातात दोनजण जागीच ठार झाले असून चारजण गंभीर जखमी झाले आहेत.

  ही घटना सोमवारी  सकाळी आठ वाजण्याच्या दरम्यान घडली . जखमींना पुढील उपचारासाठी एम.जी.एम रुग्णालयात दाखल केले आहे. ट्रेलरमध्ये गुरांचा मांस असल्याचे उपस्थितांच्या निदर्शनात येताच एकच खळबळ उडाली आहे.

 ढेकू जवळील पुलावर स्विफ्ट कार, टेम्पो आणि ट्रकला ठोकर मारून पलटी झाला. चार वाहनांच्या या भीषण अपघातात दोघेजण जागीच ठार झाले आहेत. यावेळी काहीजण वाहनांमध्ये अडकून पडले होते त्यांना काढण्यासाठी ढेकू गावातील तरुण, पोलीस,अपघातग्रस्त ग्रुपचे सदस्य, देवदूतचे सदस्य एकत्र येऊन प्रयत्न करीत चार जखमींना बाहेर काढून पुढील उपचारासाठी कामोठे येथील एम.जी.एम रूग्णालयात हालविण्यात आले.दरम्यान आपघाताची मालिका मोठी असल्याने  वाहतूक कोंडी झाली असता जुन्या महामार्गावरून सोडण्यात आली. पोलिसांनी तासाभरात वाहतूक सुरळीत सुरू केली.