खोपोली,

 पेण-खोपोली रस्त्यावरील साजगांव फाट्यावर एसटी बसला फाँर्च्युनर कारने जोरदार धडक दिल्याने  सोमवारी  पहाटेच्या सुमारास अपघात  घडला आहे. अपघातात जिवितहानी झाली नसली तरी दोन्हीही वाहनांचे प्रचंड नुकसान झाले. या आपघाताच्या आवाज जोरात येताच आजूबाजूचे लोक घटनास्थळी पोहचून मदतकार्य केले आहे तर रस्त्याच्या मधोमध आपघात घडल्याने वाहनांची रांग लागली होती.वाहतुक पोलिसांनी वाहतुक सुरळीत करीत क्रेनच्या सहाय्याने कार बाजूला केली आहे.

  साजागांव फाटा येथे पहाटे - 5.45 वाजण्याच्या दरम्यान खोपोलीहून पेणच्या दिशेला जाणार्‍या एसटीला  फाँर्च्युनर कारने समोरून जोरदार धडक दिली असता कार चालकाच्या बाजूच्या मोठे नुकसान झाले असून टायरच तुटून बाहेर निघाल्याने कार रस्त्याच्या मधोमध थांबली होती. यादरम्यान कारमध्ये प्रवासी अडकले असता शेजारील दुकानदारांंना तातडीने मदतकार्य करीत बाहेर काढले. जोरदार धडकेच्या आवाजाने आजूबाजूचे लोक भितीने घटनास्थळी पोहचले . सकाळी अनेक कंपनीचे कामगार घेवून जाणार्‍या  बसेसची वाढती गर्दी पाहता वाहतुक पोलिसांनी वाहने दुसर्‍या रस्त्याने वळवित वाहतुककोंडी होवू दिली नाही. फाँर्च्युनर कार गुजरात पासिंग असली तरी त्यामधील लोक स्थानिक असल्याचे समोर आले.

अवश्य वाचा