Saturday, December 05, 2020 | 10:48 AM

संपादकीय

गुंतवणुकीसाठी स्पर्धा

महाराष्ट्रातील गुंतवणूक आपल्या राज्यात यावी यासाठी यापूर्वी स्पर्धेत असलेल्या...

एक्सप्रेस वे , आडोशी बोगद्याच्या जवळ सहा कार एकमेकांना...
रायगड
22-Nov-2020 06:01 PM

रायगड

खोपोली  

दिवाळी चा मोसम संपल्यावर अनेक कुटुंबे हिवाळी पर्यटनासाठी घराबाहेर पडले आहेत .त्यामुळे एक्सप्रेस वे सहित खोपोली-खालापुरातील सर्व रस्ते व महामार्ग चार चाकी वाहनांनी फुल आहेत .सर्वाधिक वाहने एक्सप्रेस वे वर आल्याने वाहतूक कोंडी सहित अपघात घडत आहेत .रविवारी सकाळी अकराच्या सुमारास एक्सप्रेस वे वरील आडोशी बोगद्याजवळ सहा वाहने एकमेकांना धडकले .यात सहाही वाहनांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अपघाताची तीव्रता बघता मोठी आपत्कालीन स्थिती निर्माण झाली मात्र सुदैवाने यात जीवित हानी मात्र टळली आहे.

अपघाताची माहिती होताच , एक्सप्रेस वरील आयआरबी वाहतूक नियंत्रण व्यवस्था, अपघातसमयी मदतीसाठी असलेली डेल्टा फोर्स , खोपोली पोलीस व महामार्ग वाहतूक पोलिसांनी तातडीने सर्व अपघात ग्रस्त नागरिक व वाहनांना तातडीने योग्य मदत केली .तसेच एक्सप्रेस वे सुरळीत वाहतुकीसाठी योग्य प्रयत्न केल्याने , दहा ते पंधरा मिनिटात परिस्थिती सामान्य होऊन येथील वाहतूक सुरळीत करण्यात आली.

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top