पनवेल 

रस्त्यात निष्काळजीपणे उभ्या करून ठेवलेल्या टेम्पोला मागून येणार्‍या होंडा अ‍ॅक्टिव्हाने धडक दिल्याने झालेल्या अपघातात अ‍ॅक्टीव्हा गाडीवरील एकाचा मृत्यू झाला. तर दुसरा इसम जखमी झाला आहे.

पनवेल जवळील गोवा - मुंबई महामार्गावरील जय मल्हार हॉटेलच्या समोर पळस्पे परिसरात ही घटना घडली. रस्त्याच्या मधोमध निष्काळजीपणे टेम्पो चालकाने निशाणी न लावता तसेच लाईट न लावता टेम्पो उभा ठेवला होता. होंडा अ‍ॅक्टिव्हा गाडीच्या चालकाला सदर टेम्पो लक्षात न आल्याने त्याने धडक दिल्याने झालेल्या अपघातात या गाडीवरील अविनाश कांबळे (30 रा.गोवंडी) हे गंभीररित्या जखमी होवून मयत झाले आहेत. तर त्यांचा सहकारी मनोज चिटणे (30 रा.गोवंडी) हा गंभीर जखमी झाला आहे. या अपघाताची नोंद पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

 

अवश्य वाचा

गर्भातील बाळाला दिले रक्त