अलिबाग

अलिबाग बायपास रस्त्यावरील भारत पेट्रोलपंपा समोर दोन मोटारसायकलीची धडक होऊन झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला. मंगळवारी (दि.15 ) सकाळी साडे दहाच्या सुमारास हा अपघात घडला.

 मनोहर शांताराम नाईक वय 47 रा. पाल्हे नागांव ता. अलिबाग असे मृत मोटार सायकलस्वाराचे नाव असून मनोहर नाईक ज्युपिटर गाडीवरुन बायपास रस्त्यावरुन चालले होते. भारत पेट्रोलपंपावर आले असता समोरुन भरधाव वेगाने येणार्‍या  अ‍ॅक्टिव्हा चालकाने त्याना जोरात धडक दिली. या अपघातात गंभीर  जखमी झालेल्या मनोहर नाईक यांचा जागीच मृत्यू झाला. या अपधातांची नोंद अलिबाग पोलीस ठाण्यात करण्यात आली. सरकार तर्फे अनिकेत कृष्णा म्हात्रे यानी घटनेची फिर्याद दिली असून याप्रकरणी मेटल मोटार अपघात झाला आहे.  अ‍ॅक्टिव्हा चालक हा 16 वर्षीय अल्पवयीन मुलगा  आहे. त्या दृष्टीने पुढील कारवाही सुरु आहे. या घचनेचा तपास नाईक पाटील करत आहेत.

 

अवश्य वाचा