नेरळ,

चुकीच्या रस्त्याने आपल्या इच्छित पत्त्यावर जाण्याचा प्रयत्न करीत असलेला 10 टन मालाने भरलेला ट्रक नेरळ येथील पेशवाई रोडवर कलंडून शनिवारी झालेल्या अपघातात ट्रकच्या क्लिनरचा मृत्यू झाला असून चालक आणि क्लिनर हे मूळचे उत्तरप्रदेश राज्यातील आहेत. पाषाणे येथे असलेल्या इझर्बिया कंपनीच्या प्रकल्पावर जिप्समच्या बॅग घेऊन ट्रक नवी मुंबई येथील जेएनपीटी बंदरातून निघाला होता. हा ट्रक दामत येथे नेरळ गावाला वळसा घालून जाण्यासाठी पेशवाई रस्त्याने नेरळ साईमंदिर असा येऊ लागला. साधारण साडे चारच्या सुमारास हा ट्रक पेशवाई रस्त्याने पुढे जात असताना डाव्या बाजूला कलंडत होता. हे पाहून त्या ट्रकचा क्लिनर मुकेश रामात्रे-20 याने ट्रक मधून खाली खड्ड्यात उडी मारून स्वतःचा जीव वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यावेळी क्लिनरने ज्या खड्ड्यात उडी मारली, अगदी त्याच खड्ड्यात तो ट्रक जाऊन कलंडला. त्यावेळी झालेल्या अपघातात ट्रकचा क्लिनरच्या अंगावर 10 टन माल असलेला ट्रक कोसळल्याने क्लिनर मुकेश रामात्रे याचा जागीच मृत्यू झाला. अपघातात ट्रकचा चालक कालिका नवना-27 याला कोणत्याही प्रकारची जखम झाली नाही. कलंडलेल्या ट्रक मधील 200 बॅग जिप्सम हे दोन टेम्पो आणून खाली करण्याचे काम तसेच ट्रक उचलून रस्त्यावर आणण्याचे काम सुरू होते. 

अवश्य वाचा

गर्भातील बाळाला दिले रक्त