सुकेळी  

  मुंबई -गोवा महामार्गावर अपघातांसाठी  धोकादायक खिंड अशी ओळख असलेल्या सुकेळी खिडिंमध्ये मोटरसायकल घसरुन झालेल्या अपघातात मोटरसायकल चालक गंभीर जखमी झाला. हा अपघात मंगळवारी  सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास घडला.

  यासंदर्भात उपलब्ध झालेल्या माहीतीनुसार कोलाड बाजुकडुन पनवेल येथे जाणारी बुलट मोटरसायकल क्रं. एम. एच. 46 ए ए. 362 ही गाडी सुकेळी खिंडीत आल्यानंतर मोटरसायकल चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे गाडी रस्त्यावर घसरुन पडली. त्यामुळे या अपघातात दशरथ काशीनाथ शुरसे (वय-54) रा. ओ. एन. जी. सी.  काँलणी पनवेल हा गंभीररित्या जखमी झाला असुन त्याच्यावर प्राथमिक आरोग्य केंद्र नागोठणे येथे प्रथमोपचार करुन पुढील ऊपचारासाठी पनवेल येथे पाठविण्यात आले आहे.

 दरम्यान या अपघाताची खबर मिळताच ऐनघर पोलिस चौकीचे अशोक घोलप तसेच त्यांचे सहकारी संदिप घासे यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन जखमी झालेल्या रुग्णाला ऊपचारासाठी नागोठणे येथिल प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात  आले. या अपघाताचा पुढिल तपास नागोठणे पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक दादासाहेब घुटुकडे यांच्या मार्गदर्शनाखाली गायकवाड करीत आहेत आहेत.

 

अवश्य वाचा

गर्भातील बाळाला दिले रक्त