Saturday, March 06, 2021 | 01:50 AM

संपादकीय

विज्ञान शिक्षणासाठी मराठी विद्यापीठ!

मराठी राजभाषा दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिन

पोलादपूर कशेडी घाटात टेम्पो उलटून दोघांना गंभीर दुखापत
रायगड
22-Feb-2021 08:02 PM

रायगड

। पोलादपूर । प्रतिनिधी ।

तालुक्यातील मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वरील कशेडी घाटामध्ये भोगाव ग्रुपग्रामपंचायत हद्दीतील येलंगेवाडी येथील तीव्र वळण उतारावर गोवा येथून गुजराज राज्यातील वापी येथे जाणारा टेम्पो कलंडून दोघेजण गंभीर जखमी झाले. यामध्ये एका महिलेचा समावेश आहे.रविवार दि.21 फेबवारी 2021 रोजी सायंकाळी आयशर टेम्पो (जी.जे.15 एटीएम 7231) हा भोगाव गावाच्या हद्दीमध्ये कलंडून अपघात झाला. या अपघातात टेम्पोमधील माल दरीमध्ये विखुरलेल्या अवस्थेत आढळून आला असून या अपघातामध्ये टेम्पोचालकासोबत एक महिला डोक्याला जबर दुखापत झाल्याने गंभीर जखमी झाली.या अपघातात चालक टेम्पो चालक यादव याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून संगीता आण्णा जाधव (वय 40) हिस डोकीस गंभीर दुखापत झालेली आहे. याखेरिज, सरिता प्रकाश जाधव हिस किरकोळ दुखापत झाली. या सर्वांना उपचारासाठी सरकारी दवाखान्यात पोलादपुर येथे तात्काळ रवाना केले. दरम्यान, कशेडी घाटातील वाहतूक सुरळीत करण्यात वाहतुक पोलीस कशेडी टॅप यांना यश आल्याची माहिती वाहतुक पोलीस सहायक फौजदार बोडकर यांनी दिली.

 

 

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top