अलिबाग,

 राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाहन ताफ्यातील एक वाहन उलटल्याची घटन सोमवारी सकाळी अमृतांजन पुलाखाली घडली आहे. सुदैवाने यामध्ये जीवीतहानी झालेले नाही. पण चालकासह एक अधिकारी जखमी झाले आहेत. शरद पवार हे वाहन ताफ्यासह मुंबईच्या दिशेने जात असता हा अपघात घडला आहे.

 सोमवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास शरद पवार हे आपल्या वाहन ताफ्यासह पुण्याहून मुंबईला जाण्यासाठी निघाले होते. मुंबईच्या दिशेने जात असताना पवार यांच्या वाहन ताफ्यातील पाठीमागील पोलिस व्हॅन (एमएच 12 एनयु 5881) ही अचानकपणे उलटली.

त्यामध्ये चालक आणि एक अधिकारी जखमी झाले. पाठीमागील गाडी उलटल्याचे लक्षात आल्यानंतर शरद पवार यांनी गाडी थांबवून अपघातात जखमी झालेल्यांची विचारपूस केली. उपचारासाठी त्यांना हॉस्पीटलमध्ये पाठवण्यात आले आहे. अपघाताची माहिती लोणावळा पोलिसांना कळवण्यात आली आहे. दरम्यान, अपघातामध्ये पोलिस व्हॅनचे नुकसान झाले आहे.

अवश्य वाचा

रत्नागिरीत मुसळधार पाऊस