Saturday, December 05, 2020 | 10:28 AM

संपादकीय

गुंतवणुकीसाठी स्पर्धा

महाराष्ट्रातील गुंतवणूक आपल्या राज्यात यावी यासाठी यापूर्वी स्पर्धेत असलेल्या...

अँपे रिक्षा व मोटारसायकलची जोरदार धडक
रायगड
22-Nov-2020 06:06 PM

रायगड

पाली/बेणसे 

करचुंडे मार्गावर  अँपे रिक्षा व मोटारसायकलची जोरदार धडक होऊन झालेल्या अपघातात दोन्ही वाहनचालक  जखमी झाल्याची घटना दि.(22)रविवारी घडली. याबाबत अँपे रिक्षा चालकाने पाली पोलीस स्थानकात दिलेल्या जबाबानुसार व पाली पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 

चंद्रकांत शिंदे (49) वर्ष रा.उंबरवाडी, ता. सुधागड हे आपल्या ताब्यातील अँपे रिक्षा क्र. एम एच 06 बि व्ही 2518 स्वतः चालवीत घेऊन जात होते.यावेळी वाहनात पाठीमागील सीटवर जयश्री शिंदे, प्रवीण वाघमारे, पिंकी वाघमारे आदी प्रवाशी होते. सदरची अँपे रिक्षा चालवीत मौजे करचुंडे गावच्या हद्दीत छोट्या पुलाजवळ आले असता समोरून टीबल सीट आलेल्या शाईन मोटरसायकल क्र एम.एच 06 बि एन 2124 

ची जोरदार धडक बसून अपघात झाला. याअपघातात अँपे रिक्षा चालक 

चंद्रकांत शिंदे व मोटरसायकलस्वार सागर बबन वाघमारे दोघे जखमी झाले आहेत. सदर अपघाताची नोंद पाली पोलीस स्थानकात करण्यात आली असून पुढील तपास पाली पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ना.के एन भोईर करीत आहेत.

 

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top