जेएनपीटी 

सिंगापूर पोर्ट जवळील रस्त्यावर मालाची आयात-निर्यात करणार्‍या कंटेनर टेलरला दि. 10 रोजी रात्री अपघात झाल्याची घटना घडली. या अपघातात रस्त्यावरून मार्गक्रमण करणारा मोटारसायकलस्वार बचावला असल्याचे नागरिकांकडून सांगण्यात येत आहे.

जेएनपीटी बंदराच्या अखत्यारीत असलेल्या सिंगापूर पोर्ट मध्ये अपघाताची मालिका सुरू आहे.त्यात मागील महिन्यात सिंगापूर पोर्ट मध्ये आँईल या तेलाची आयात - निर्यात करणार्‍या कंटेनर टेलरला अपघात झाल्याची दुदैवी घटना घडली होती.या अपघातात मनुष्य हाणी झाली नसली तरी लाखो रुपये किंमतीचे हजारो लिटर आँईल तेल रस़्त्यावरुन खाडीत वाहून गेले होते.त्यानंतर पुन्हा मालाची आयात-निर्यात करणार्‍या कंटेनर टेलरला त्याच ठिकाणी अपघात झाल्याची दुदैवी घटना गुरुवारी घडली आहे.

या अपघातात रस्त्यावरून मार्गक्रमण करणारा मोटारसायकल स्वार बचावला असला तरी पुन्हा एकदा मालाचे नुकसान झाले आहे.तरी जेएनपीटी बंदर आणि सिंगापूर पोर्टच्या प्रशासनाने बंदर परिसरात होणारे अपघात रोखण्यासाठी तसेच आजुबाजुच्या प्रजेच्या सुरक्षिततेसाठी योग्य ती उपाययोजना करणे गरजेचे आहे.नाहीत या मार्गावरुन प्रवास करणार्‍या प्रवाशांच्या, कामगार वर्गाच्या जीवीतास धोका निर्माण होऊ शकते अशी भिती जसखार गावातील सामाजिक कार्यकर्ते शरद म्हात्रे यांनी भिती व्यक्त केली आहे. 

 

अवश्य वाचा

गर्भातील बाळाला दिले रक्त