पनवेल 

पनवेल जवळील गव्हाणफाटा ते स्पीड ब्रेकर ढाब्याच्या मध्ये दिघोडा गावाकडे जाणार्या मार्गावर जेएनपीटीकडून पळस्पेकडे जाणार्या रस्त्यावर एका अज्ञात वाहनाची धडक मोटार सायकलस्वारास बसल्याने त्यात त्याचा गंभीररित्या जखमी होवून मृत्यू झाला आहे.

मयत नामे श्रीकांत भिवाजी पाटील (33) हे त्यांच्या ताब्यातील हिरोेहोंडा पॅशन प्रो क्र.एमएच-03-एवाय-7812 ने नवघर ते पनवेल असा प्रवास करीत असताना जेएनपीटी-पनवेल बायपास रोडवर स्पीड ब्रेकर ढाब्याजवळ त्यांच्या गाडीला कोणत्यातरी अज्ञात वाहनाची धडक बसल्याने झालेल्या अपघातात ते गंभीररित्या जखमी झाले व त्यात त्यांचा मृत्यू झाला आहे. या अपघाताची नोंद पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून सदर अनोळखी वाहनाचा शोध पोलीस उपनिरीक्षक आकाश पवार करीत आहेत.

 

अवश्य वाचा