Wednesday, December 02, 2020 | 12:01 PM

संपादकीय

शेतकर्‍यांचा एल्गार

राजधानी दिल्लीत कडाक्याच्या भर थंडीत शेतकर्‍यांनी घेराव घातल्याने......

विधानपरिषद पदवीधर-शिक्षक निवडणूक
पुणे
12-Nov-2020 06:00 PM

पुणे

विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे भाजप , महाविकास आघाडी , मनसे , वंचित आणि बंडखोरांची लगबग सुरु झाली आहे. आज अनेक उमेदवार अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी त्या-त्या पक्षाचे बडे नेते उपस्थित राहणार आहेत. तर, राष्ट्रवादी, भाजपला बंडखोरीचं ग्रहण लागलं आहे.

पुण्यात कोणाकोणात सामना?

संग्राम देशमुख (भाजप)  अरुण लाड (राष्ट्रवादी)  प्रताप माने (राष्ट्रवादी बंडखोर)  रुपाली पाटील ठोंबरे (मनसे)  शरद पाटील (जनता दल)  सोमनाथ साळुंखे (वंचित)  श्रीमंत कोकाटे (इतिहास संशोधक)

नागपुरातून रिंगणात कोण?

अभिजित वंजारी (काँग्रेस)  संदीप जोशी (भाजप)  राहुल वानखेडे (वंचित) नितीन रोंघे (विदर्भवादी उमेदवार)

औरंगाबादमध्ये कोणाकोणात लढत?

शिरीष बोराळकर (भाजप) प्रवीण घुगे (भाजप बंडखोर)  रमेश पोकळे (भाजप बंडखोर) नागोराव पांचाळ (वंचित) सतीश चव्हाण (राष्ट्रवादी) जयसिंगराव गायकवाड (भाजप)  ईश्‍वर मुंडे (राष्ट्रवादी)

अमरावती शिक्षक पदवीधर मतदारसंघ

श्रीकांत देशपांडे (शिवसेना) नितीन धांडे  दिलीप निंभोरकर (शिक्षक भारती) संगीता शिंदे शिक्षण संघर्ष समिती कडून (भाजपा माजी कृषी मंत्री अनिल बोंडे यांची बहीण )  प्रकाश काळबांडे ( विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ )

पुणे शिक्षक संघ  जयंत आसगावकर (काँग्रेस) उत्तम पवार (पदवीधर कल्याण मंडळ)

एक डिसेंबरला निवडणुकीसाठी मतदान

राज्यातील 5 पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकांचं बिगुल वाजले आहे. यामध्ये तीन जागा पदवीधर मतदारसंघ तर 2 जागा शिक्षक मतदारसंघाच्या आहेत. या पाच जागांसाठी पुढील महिन्यात (डिसेंबर) 1 तारखेला मतदान होईल तर 3 डिसेंबरला निवडणुकांचे निकाल जाहीर होणार आहे. या निवडणुकीसाठी 5 नोव्हेंबरपासून अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 नोव्हेंबर आहे. 13 नोव्हेंबरला आलेल्या अर्जांची छानणी होणार आहे. तसेच अर्ज मागे घेण्याची तारीख 17 नोव्हेंबर आहे.

 

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top