Tuesday, April 13, 2021 | 12:36 PM

संपादकीय

विज्ञान शिक्षणासाठी मराठी विद्यापीठ!

मराठी राजभाषा दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिन

सप्टेंबरपर्यंत येणार दुसरी कोरोना लस
पुणे
27-Mar-2021 07:46 PM

पुणे

 

। पुणे । प्रतिनिधी ।

भारतात सध्या कोरोनाच्या रुग्णसंख्येत पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे भारताने आता देशांतर्गत कोरोना लसीचा तुटवडा जाणवू नये म्हणून सीरम इन्स्टिट्यूट आणि नोव्हावॅक्स यांच्या भागिदारीतून कोवाव्हॅक्स या कोरोना प्रतिबंधित लसी निर्मिती करण्यात येत असून, भारतात या लसीच्या चाचणीला सुरुवात झाली आहे. येत्या सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत कोव्होवॅक्स बाजारात येणार असल्याचे अदर पुनावाला यांनी सांगितले.अमेरिकेतील बायोटेक कंपनी नोव्हावॅक्स आणि पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटच्या भागिदारीतून कोव्होवॅक्स या कोरोना लसीची निर्मिती करण्यात येत आहे. ही लस कोरोनाच्या ब्रिटन आणि दक्षिण आफ्रिका स्ट्रेन्सविरोधात 89 टक्के कार्यक्षम असल्याचा दावा या कंपनीने केला आहे. सप्टेंबर 2021 पर्यंत ही कोरोना प्रतिबंधक लस बाजारात येण्याची शक्यता आहे, अशी माहिती सीरम इन्स्टिट्यूटचे अदर पुनावाला यांनी दिली आहे. 

जानेवारी महिन्यात नोव्हावॅक्स या लसीची चाचणी ही आफ्रिकेतील 245 कोरोना रुग्णांवर करण्यात आली होती. हे सर्व रुग्ण एचआयव्ही पॉझिटिव्ह होते. त्यांना या लसीचा डोस देण्यात आल्यानंतर असे लक्षात आलं की ही लस 48.6 टक्के प्रभावी आहे. त्यानंतर या लसीची ट्रायल ही ब्रिटनमधील 18 ते 84 वयाच्या 15,000 कोरोना रुग्णांवर करण्यात आली. त्यामध्ये 27 टक्के रुग्ण हे 65 वर्षावरील होते. त्यावेळी आलेल्या परिणामातून असं लक्षात आलं की, कोरोनाच्या मूळच्या स्ट्रेन विरोधात ही लस 96.4 टक्के प्रभावी ठरली तर ब्रिटनच्या नव्या स्ट्रेनविरोधात ती 86.3 टक्के प्रभावी ठरल्याचे दिसून आले आहे.भारतात सध्या सीरम इन्स्टिट्यूटची कोविशिल्ड आणि भारत बायोटेकच्या कोवॅक्सीनला परवानगी मिळालेली आहे. सीरमने कोविशिल्ड लस ब्रिटनच्या ऑक्सफर्ड विद्यापाठीसोबत भागीदारीने तयार केलेली. भारतासह परदेशातही अनेक ठिकाणी या लसीची निर्यात झाली. मात्र, सध्या कोविशिल्डच्या निर्यातीला केंद्र सरकारने बंदी घातली आहे.  

आतापर्यंत कोरोनाच्या नव्या स्ट्रेनवर प्रभावी असणारी लस भारतात आलेली नव्हती. नवे स्ट्रेन हे भारतात लसी आल्यानंतर आढळू लागले होते. मात्र, कोव्होवॅक्स ही लस आफ्रिकन आणि ब्रिटनच्या नव्या स्ट्रेनवरही 89 टक्के प्रभावी आहे. 

- अदर पुनावाला, सीईओ सीरम

 

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top