Wednesday, May 19, 2021 | 02:05 AM

संपादकीय

विज्ञान शिक्षणासाठी मराठी विद्यापीठ!

मराठी राजभाषा दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिन

देशात निम्म्याहून अधिक भागांत पाऊस
पुणे
12-Apr-2021 12:53 PM

पुणे

 । पुणे । वृत्तसंस्था ।

 कमी दाबाच्या क्षेत्रामुळे महाराष्ट्रासह देशाच्या निम्म्याहून अधिक भागात सध्या पावसाळी स्थिती निर्माण झाली असून, काही भागांत वादळी वार्‍यांसह पाऊस होत आहे. राज्यातील पावसाळी स्थिती आठवडाभर कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात येत आहे. शनिवारी मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी पावसाची नोंद झाली.

देशात सध्या दक्षिण-पश्‍चिम मध्य प्रदेश आणि लगतच्या भागापासून कॉमोरीन क्षेत्रापर्यंत कमी दाबाचा पट्टा कार्यरत आहे. त्यामुळे देशाच्या विविध भागात पावसाळी स्थिती निर्माण झाली आहे. हा पट्टा मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि केरळमार्गे गेला आहे. त्यामुळे राज्याच्या विविध भागात सध्या पाऊस होतो आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि कोकण विभागामध्ये आठवडाभर कमी-अधिक प्रमाणात पाऊस राहणार आहे. या दरम्यान विदर्भात गारपिटीचाही इशारा देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि दक्षिण कोकण भागात विजांच्या कडकडाटात पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

शनिवारी मध्य महाराष्ट्रातील सातार्‍यात मोठ्या पावसाची नोंद झाली, पुणे, महाबळेश्‍वर येथेही पाऊस झाला. विदर्भ आणि मराठवाड्यातही तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली. पावसाळी स्थितीमुळे दिवसाच्या कमाल तापमानात घट होऊन काही प्रमाणात दिलासा मिळाला असला, तरी रात्री ढगाळ वातावरण निर्माण होत असल्याने रात्रीच्या किमान तापमानात वाढ झाली आहे. त्यामुळे रात्रीच्या उकाड्यात वाढ झाली आहे. देशात सध्या महाराष्ट्रासह मध्य प्रदेश, छत्तीसगड, केरळ, कर्नाटक, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, बिहार, झारखंड, पश्‍चिाम बंगाल, सिक्कीम, आसाम, ओडिशा, मेघालय, अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर, त्रिपुरा, गोवा आदी राज्यांमध्ये पावसाळी स्थिती निर्माण झाली आहे.

 

 

 

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top