Tuesday, April 13, 2021 | 01:06 PM

संपादकीय

विज्ञान शिक्षणासाठी मराठी विद्यापीठ!

मराठी राजभाषा दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिन

राज्यात पुन्हा तापमानवाढीची शक्यता
पुणे
04-Apr-2021 05:46 PM

पुणे

। पुणे । वृत्तसंस्था ।

विदर्भ वगळता राज्यात इतरत्र सध्या दिवसाच्या कमाल तापमानात गेल्या आठवडयाच्या तुलनेत घट झाली असली, तरी दोन ते तीन दिवसांत तापमानाचा पारा पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे विदर्भात 5 ते 7 एप्रिल या कालावधीत उष्णतेची दुसरी लाट येण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

निरभ्र आकाश आणि कोरडया हवामानाच्या स्थितीमुळे राज्यातील तापमानात गेल्या आठवडयात मोठी वाढ झाली होती. उत्तरेकडील काही राज्ये आणि गुजरातमध्ये उष्णतेची तीव्र लाट होती. राज्यात कोकण विभागापाठोपाठ विदर्भातही उष्णतेची लाट आली होती. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडयात बहुतांश ठिकाणी तापमानाचा पारा 40 अंशांपर्यंत गेला होता. सध्या दक्षिण महाराष्ट्राची किनारपट्टी आणि लगतच्या भागावर चक्रीय चक्रवात तयार झाला आहे. त्याचा परिणाम म्हणून तापमानात काही प्रमाणात घट झाली आहे.

मध्य महाराष्ट्रात सोलापूर वगळता इतरत्र तापमान सरासरीच्या जवळ आणि 40 अंश सेल्सिअसच्या खाली आहे. कोकण विभागातही बहुतांश ठिकाणी तापमान कमी झाले आहे.

विदर्भात मात्र सर्वत्र 40 ते 43 अंश सेल्सिअसच्या दरम्यान तापमान आहे. शनिवारी राज्यातील उच्चांकी किमान तापमान ब्रह्मपुरी येथे 43.2 अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. दोन दिवसांनंतर त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता असून, 5 ते 7 एप्रिल दरम्यान उष्णतेच्या लाटेची स्थिती निर्माण होणार असल्याचा अंदाज आहे. याच वेळी मध्य प्रदेशातही उष्णतेची लाट असणार आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकण विभागातही याच दरम्यान तापमानाचा पारा 2 ते 3 अंशांनी वाढण्याची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे.

 

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top