Tuesday, April 13, 2021 | 12:14 PM

संपादकीय

विज्ञान शिक्षणासाठी मराठी विद्यापीठ!

मराठी राजभाषा दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिन

पुण्यात जम्बो कोव्हिड हॉस्पिटल पुन्हा सुरू
पुणे
23-Mar-2021 07:48 PM

पुणे

। पुणे । वृत्तसंस्था ।

पुणे शहरातील वाढती कोरोना रुग्णसंख्या लक्षात घेत पालिकेनं आजपासून जम्बो कोविड हॉस्पिटल पुन्हा सुरु केलं आहे. महापौर मुरलीधर मोहोळ, महापालिका आयुक्त विक्रम कुमार आणि अतिरिक्त आयुक्त रूबल आगरवाल यांनी आज जम्बो हॉस्पिटलची पाहणी करून तिथल्या रूग्णसेवेचा आढावा घेतला.

गेले दोन महिने हे जम्बो कोविड सेंटर बंद होतं. डिसेंबर महिन्यात पुणे शहरात कोरोनावर नियंत्रण आल्यानंतर जम्बो कोविड हॉस्पिटल बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. ही पुणेकरांसाठी दिलासादायक बाब असली तरी फेब्रुवारी 2021 पासून पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढले आणि दिवसेंदिवस रुग्णसंख्या नवीन रेकॉर्ड करु लागली. याच पार्श्‍वभूमीवर महानगरपालिकेने शिवाजीनगर येथील जम्बो कोविड सुरु करण्याचा निर्णय घेतला. हे जम्बो सेंटर चालवण्यासाठीचा सर्व खर्च हा पुणे मनपामार्फत केला जाणार असल्याचं महापौर मुरलीधर मोहोळ यांनी  म्हटलं आहे.

पुणे शहरात कोरोना बाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढू लागली असली तरी यातील बहुतेक रुग्णांना कोणतेही लक्षण नाहीत किंवा सौम्य लक्षणे आहेत आणि त्यामुळे पहिल्यावेळी 18 ते 20 टक्के रुग्ण रुग्णालयात उपचार घेत होते. मात्र आता फक्त दहा टक्के रुग्ण रुग्णालयात उपचार घेत असल्याचे आयुक्त विक्रम कुमार यांनी म्हटलं.

पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 2 लाख 35 हजार 394 पुण्यातील अक्टिव्ह रुग्ण संख्या- 22 हजार 524 रुग्णांवर उपचार सुरू आहेत दरम्यान, जरी खाजगी आणि शासकीय रुग्णालयात बेड्स उपलब्ध असले तरी रुग्णांची वाढती आकडेवारी पालिकेची चिंता वाढवणारी आहे आणि त्यामुळेच जम्बो कोविड रुग्णालय सुरु करण्यात आलं आहे. 

   

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top