Tuesday, April 13, 2021 | 12:31 PM

संपादकीय

विज्ञान शिक्षणासाठी मराठी विद्यापीठ!

मराठी राजभाषा दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिन

ती केवळ अफवा ः बोर्ड
पुणे
18-Mar-2021 09:09 PM

पुणे

 

। पुणे । प्रतिनिधी ।

दहावी आणि बारावीच्या उत्तीर्णतेच्या पात्रतेत कुठलाच बदल करण्यात आला नसल्याचे राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने स्पष्ट केले आहे. यावर्षी उत्तीर्ण होण्यासाठी 35 ऐवजी 25 टक्के गुण पुरेसे ठरणार असल्याची चर्चा होती. पण ती केवळ अफवा आहे, त्यावर कुणी विश्‍वास ठेवू नये, असे मंडळातर्फे आवाहन करण्यात आले आहे.दहावीची परीक्षा 29 एप्रिल ते 20 मेदरम्यान तर बारावी बोर्डाची परीक्षा 23 एप्रिल ते 21 मेदरम्यान होणार आहे. पण, दुसरीकडे राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असताना आता याबाबत पुढील दोन दिवसात बोर्डाकडून पुन्हा मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात येणार आहे.दहावीची प्रात्यक्षिक श्रेणी तोंडी परीक्षा 12 एप्रिल ते 28 एप्रिल 2021 दरम्यान होणार असून,बारावीचे प्रात्यक्षिक श्रेणी तोंडी परीक्षा 5 एप्रिल ते 22 एप्रिल 2021 दरम्यान होणार आहे. परीक्षा या लेखी पद्धतीनेच होणार आहे, असं या आधीच सरकारने स्पष्ट केलं आहे. पण,आता कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि रोज वाढत जाणारी रुग्णसंख्या यामुळे प्रशासन आणि बोर्ड काय निर्णय घेते, हे पाहावे लागेल.सोशल मीडियावर दहावी आणि बारावी परीक्षांबाबत विविध अफवा पसरवल्या जात आहेत. त्यामुळे कोणत्याही अफवांवर विश्‍वास न ठेवण्याचे आवाहन बोर्डाने केले आहे. बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर सर्व माहिती दिली जाणार आहे.

 

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top