Friday, March 05, 2021 | 07:04 AM

संपादकीय

विज्ञान शिक्षणासाठी मराठी विद्यापीठ!

मराठी राजभाषा दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिन

मटणाच्या मागणीत वाढ
पुणे
20-Jan-2021 04:12 PM

पुणे

 । पुणे । वृत्तसंस्था ।

बर्ड फ्लूमुळे ग्राहकांनी चिकनकडे पाठ फिरवली असून मटण,मासळीच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे.मागणीच्या तुलनेत बकरे,मेंढया उपलब्ध होत नसल्याने मटण विक्रेत्यांची धावाधाव सुरू झाली आहे.

 पुणे शहरात मागणी वाढल्याने एक किलो मटणाची विक्री 660 ते 680 रुपये दराने केली जात आहे.सांगली, कोल्हापुरात मटणाला मागणी वाढली असली तरी दर स्थिर आहेत.अवेळी झालेल्या पावसामुळे ओला चारा खाणार्‍या शेळी, मेंढयाच्या वाढीवर परिणाम झाला आहे. बकरे,मेंढीच्या वाढीसाठी साधारणपणे अडीच ते तीन महिन्यांचा कालावधी लागतो.साधारणपणे तीन ते साडेतीन महिन्यांनतर एका बक र्‍याचे वजन दहा किलोपर्यंत भरते.मेंढयाचे संगोपन करणे तसे जिकिरीचे आहे.नैसर्गिक अधिवासात त्यांची वाढ होते.मेंढपाळ गावोगावी फिरतात.यंदाच्या वर्षी अवकाळी पाऊस झाल्याने मेंढयांच्या गर्भधारणेवर परिणाम झाला. ढगाळ वातावरणात मेंढया आजारी पडतात.या कालावधीत त्या पाणीही पित नाहीत.त्यामुळे मेंढी,बकर्‍यांच्या वाढीवर परिणाम होतो,असे पुणे शहर मटण दुकानदार संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर कांबळे यांनी सांगितले.

पुणे जिल्ह्यात चाकण येथील बाजारात मालेगाव,बीड,कोपरगाव,औरंगाबाद येथून मेंढी,बकरे विक्रीस पाठविले जातात.शिरूर तालुक्यातील घोडनदी, यवत,तळेगाव ढमढेरे,अहमदनगर जिल्ह्यातील राशीन येथे बाजार भरतात.तेथे मेंढपाळ मेंढी,बकरे विक्रीस पाठवितात.पौष महिन्यात पश्‍चिम महाराष्ट्रातील गावोगावी वार्षिक यात्रांचा हंगाम सुरू झाला आहे.ग्रामपंचायत निवडणुकीमुळे मटणाला चांगली मागणी आहे.बर्ड फ्लूमुळे चिकनच्या मागणीत मोठी घट झाली असून ग्राहकांकडून मटणाला मागणी आहे.अचानक मटणाच्या मागणीत वाढ झाल्याने मेंढी,बकर्‍यांचा तुटवडा निर्माण झाला आहे.गावोगावी भरणार्‍या बाजारातून होणारी मेंढी,बक र्‍यांची आवक कमी आहे. दहा किलोच्या एका मेंढी,बक र्‍यासाठी मेंढपाळांना सात हजार रुपये मोजावे लागत आहेत.

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top