पुणे
पुणे, प्रतिनिधी
कोरोनाने डोके वर काढल्याने पुणे प्रशासनाने 28 फेब्रुवारीपर्यंत नाईट कर्फ्यू लागू केला केला होता. त्यानुसार रात्री 11 ते सकाळी 6 पर्यंतची संचारबंदी करण्यात आली होती. परंतु, कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे हा निर्णय पुन्हा वाढवण्यात आला असून, पुणे शहारातील शाळा, महाविद्यालये आणि कोचिंग क्लासेस 14 मार्चपर्यंत बंदच राहणार आहेत.
पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ट्विट करून याची माहिती दिली. शाळा, महाविद्यालये आणि कोचिंग क्लासेस 14 मार्चपर्यंत बंदच ठेवण्यात येणार आहेत. पुणे महानगरपालिका हद्दीत करोना संसर्ग वाढत असल्याने खबरदारी म्हणून शाळा, महाविद्यालये आणि कोचिंग 14 मार्चपर्यंत बंदच ठेवण्याचा निर्णय घेतला असून, या काळात ऑनलाईन शिक्षणास परवानगी असेल, अशी माहिती मोहोळ यांनी दिली.
रात्री 11 ते सकाळी 6 या वेळेत पुणे महानगरपालिका हद्दीत संचार निर्बंध कायम ठेवण्यात आली असून अत्यावश्यक सेवा, शिफ्टमध्ये कामकाज करणार्यांना यात मुभा देण्यात येत आहे. तर अनावश्यक फिरणार्यांवर कारवाई सुरु राहणार आहे, असं मुरलीधर मोहोळ यांनी म्हटलं आहे.