Friday, March 05, 2021 | 06:03 AM

संपादकीय

विज्ञान शिक्षणासाठी मराठी विद्यापीठ!

मराठी राजभाषा दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिन

नियोजनाअभावी प्रीपेड वीज मीटर योजनेचा बोजवारा
पुणे
18-Jan-2021 03:31 PM

पुणे

। पुणे । वृत्तसंस्था ।

वीज देयकांच्या थकबाकीचा डोंगर वाढत असल्यामुळे महावितरण सध्या मोठया आर्थिक अडचणीत सापडली आहे.त्यामुळे थकबाकीवर प्रभावी उपाय असलेल्या आधी पैसे भरा आणि वीज वापरा या प्रीपेड मीटर योजनेबाबत सध्या चर्चा सुरू झाली आहे.राज्यात दहा वर्षांपूर्वीच ही योजना सुरू करण्यात आली होती.मात्र,योग्य नियोजन नसल्याने ती बारगळल्याचे स्पष्ट झाले आहे.

टाळेबंदीच्या आठ ते नऊ महिन्यांच्या कालावधीत राज्यातील 95 लाखांहून अधिक ग्राहकांनी एकदाही विजेचे देयक भरलेले नाही.त्यामुळे घरगुती,वाणिज्यिक आणि औद्योगिक ग्राहकांकडील थकबाकीत मोठयाप्रमाणावर भर पडली आहे.कृषी ग्राहकांचीही पूर्वीची थकबाकी मोठी आहे.सध्या थकबाकीदारांवर वीजपुरवठा खंडित करण्याबाबतची कोणतीही कारवाई केली जात नाही.देयक भरण्याबाबत केवळ आवाहनावरच भर देण्यात येत आहे.सध्या संपूर्ण राज्यात सर्वच वर्गवारीतील ग्राहकांकडे 58 हजार कोटींच्या पुढे वीज देयकांची थकबाकी आहे.त्यातून महावितरणच्या आर्थिक अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे.

आधी पैसे भरा आणि वीज वापरा,या तत्त्वाने थकबाकीचा प्रश्‍नच येत नाही.याच धोरणाने 2010-11 मध्ये राज्यात प्रीपेड मीटरची योजना आणण्यात आली होती. राज्य वीज नियामक आयोगानेही त्यास मंजुरी दिली होती.हे मीटर लावणार्‍यांना वीज देयकांमध्ये पाच टक्क्यांची विशेष सूटही जाहीर करण्यात आली होती.ऐच्छिक असलेल्या या योजनेमध्ये सुरुवातीच्या टप्प्यात प्रामुख्याने सेकंड होमसाठी प्रीपेड वीज मीटर देण्यात आले.त्यानुसार लोणावळा,खंडाळा परिसरासह महाबळेश्‍वर आणि इतर काही पर्यटनस्थळांवरील सेकंड होममध्ये हे मीटर बसविण्यात आले होते.मात्र,हे मीटर रिचार्ज करून घेण्याची प्रक्रिया किचकट होती.त्यासाठी काही वेळेला महावितरणच्या कार्यालयात फेर्‍या माराव्या लागत होत्या. त्यामुळे पुढील काही वर्षांत ही योजना मागे पडली.सध्या ती बारगळल्यात जमा असून, आता नव्याने त्याबाबतचा विचार करण्यात येत आहे. राज्याच्या ऊर्जामंत्र्यांनीही त्याबाबत नुकतेच सूतोवाच केले आहे

 

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top