पुणे
। पुणे । वृत्तसंस्था ।
सीरम इन्स्टिट्यूटच्या नवीन इमारतीमध्ये आग लागल्याची घटना घडली आहे. अग्निशमन दलाच्या तीन गाड्या, वॉटर टँक आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. कोरोनावरील कोविशील्ड लस तयार करणारा भाग सुरक्षित असून त्या ठिकाणी आग लागली नसल्याची माहिती सीरमनं दिली आहे.