Monday, January 18, 2021 | 03:10 PM

संपादकीय

ड्रायव्हरलेस मेट्रोचं लक्षवेधी तंत्र!

किंबहुना, असं म्हणणार्‍यांना वेड्यात काढलं गेलं असतं.

पुण्यात 30 जानेवारीला एल्गार परिषद
पुणे
31-Dec-2020 06:42 PM

पुणे

पुणे,प्रतिनिधी

 पुण्यात  30  जानेवारीला एल्गार परिषदेचे आयोजन करण्यात येणार असल्याची घोषणा माजी.न्या.बी.जी.कोळसे पाटील यांनी गुरुवारी पुण्यात केली. एल्गार परिषदेच्या माध्यमातून  आम्ही आमचे विचार प्रत्येक घटकांपर्यंत पोहोचविण्याचे काम करणार आहोत. त्यासाठी आम्ही यंदा गणेश कला क्रीडा रंगमंच येथे एल्गार परिषद घेण्याबाबत परवानगी मागितली. पण ती नाकारण्यात आली असून आता आम्ही 30 जानेवारी रोजी कला क्रीडा रंगमंच येथे एल्गार परिषद घेणार आहोत. पण पोलिसांनी परवानगी नाकारल्यास रस्त्या वर एल्गार परिषद घेऊ, अशी भूमिका भीमा कोरेगाव शौर्य दिन प्रेरणा अभियान पुणे समन्वय समितीचे माजी न्यायाधीश बी. जी. कोळसे पाटील यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत मांडली.

 अखेर जेलभरोची आमची तयारी असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी बी. जी. कोळसे पाटील म्हणाले की, अन्न वस्त्र, निवारा, आरोग्य आणि चांगले शिक्षण याभोवती राजकारण फिरले पाहिजे. यासाठी आमचा मागील कित्येक वर्षापासून आमचा लढा सुरू आहे. तेच आम्ही काम करतोय. पण हिंदू मुस्लिम, लव्ह जिहाद, जाती धर्म या भवती राजकारण फिरत आहे. हे चुकीचे असून आम्ही एल्गार परिषदेच्या माध्यमातून जनतेला मूलभूत हक्क मिळण्याच्या दृष्टीने विचार मांडण्याचे काम करीत असल्याचे त्यांनी सांगितले तसेच ते पुढे म्हणाले की, मागील तीन वर्षापूर्वी एल्गार परिषदेच्या नंतर जी घटना घडली आणि अनेक संदर्भ जोडले गेले. ते चुकीचे असून या परिषदेच्या पैशांबाबत सांगयाचे झाल्यास यामध्ये आमचा एकही पैसा लागला नाही. आमच्यावर खोटे आरोप केले. ज्या व्यक्ती सोबत नाव जोडले गेले. त्यांना कधी ही भेटलो नाही. हे यापूर्वी देखील तपास यंत्रणेला सांगितले असून आज देखील तेच सांगतो. माझ्या घरी जरी आला. तर काहीच नसून ईडी देखील वेडी होईल, अशी भूमिका त्यांनी मांडली.

 

  

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top