Monday, January 18, 2021 | 03:08 PM

संपादकीय

ड्रायव्हरलेस मेट्रोचं लक्षवेधी तंत्र!

किंबहुना, असं म्हणणार्‍यांना वेड्यात काढलं गेलं असतं.

कोरोनाचे काऊंटडाऊन सुरु!
पुणे
12-Jan-2021 07:51 PM

पुणे

पुणे, प्रतिनिधी

कोरोनावर मात करण्यासाठी भारतात सीरम आणि ऑक्सफोर्डने तयार केलेल्या कोविशिल्ड आपत्कालीन वापरासाठी परवानगी मिळाली आहे. येत्या 16 जानेवारीपासून प्रत्यक्ष लसीकरणास सुरुवात होणार आहे. त्यामुळे कोरोनाचे  काऊंटडाऊन सुरु झाले आहे. केंद्र सरकारकडून खरेदीची ऑर्डर प्राप्त होताच सीरमकडून मंगळवारी पहाटेपासून लसीच्या वितरणाला सुरुवात झाली.

पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटमधून कोविशील्ड लसीचे सहा कोल्ड स्टोअरेज कंटेनरपैकी तीन कंटेनर पुणे विमानतळाच्या दिशेने पोलीस बंदोबस्तामध्ये 4 वाजून 55 मिनिटांनी रवाना झाले. यावेळी या पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांच्या हस्ते कंटेनरची पूजा करण्यात आली.

पुणे विमानतळावरुन कोरोना लसीचे डोस देशभरातील 13 शहरांमध्ये पाठविण्यात आली. यामध्ये औरंगाबाद, दिल्ली, चैन्नई, बंगळुरु, कर्नाल, कोलकाता, विजयवाडा, हैदराबाद, गुवाहटी, लखनऊ, चंढीगड आणि भुवनेश्‍वर या शहरांचा समावेश आहे.

16 जानेवारीपासून देशात कोरोना लसीकरण सुरू होणार आहे. यामध्ये सुरुवातीला तीन कोटी वैद्यकीय आणि अत्यावश्यक कर्मचार्‍यांना ही लस दिली जाणार आहे. त्यानंतर दुसर्‍या टप्प्यामध्ये 50 वर्षांपुढील लोकांना ही लस देण्यात येणार आहे, तसेच याच टप्प्यात 50 वर्षांहून कमी असलेल्या मात्र गंभीर आजार झालेल्या रुग्णांनाही लस देण्यात येणार आहे. ऑक्सफोर्ड आणि अ‍ॅस्ट्राझेनेकाने बनवलेल्या या लसीचे सीरम इन्स्टिट्यूट भारतात उत्पादन करत आहे.

एक कोटी 10 लाख डोस खरेदी करणार
भारत सरकार सीरमकडून ‘कोव्हिशिल्ड’ लसीचे एक कोटी 10 लाख डोस खरेदी करणार आहे. जीएसटीसह लसीच्या प्रत्येक डोसची किंमत 210 रुपये असेल, असे सीरमच्या अधिकार्‍याने सांगितले आहे.

जगातील सर्वात मोठी मोहीम
भारतातील लसीकरण कार्यक्रम ही जगातील सर्वात मोठी मोहीम आहे. येत्या काही महिन्यांत भारतातील 30 कोटी नागरिकांचे लसीकरण करण्यात येईल, या तुलनेत जगातील 50 देशांमध्ये केवळ अडीच कोटीच नागरिकांना लस देण्यात येईल, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

लसींच्या किंमती वेगवेगळ्या
कोव्हिशिल्डच्या प्रत्येक लसीची किंमत 210 रुपयांच्या आसपास असणार आहे. तर कोव्हॅक्सिनची किंमत ही 310 रुपयांच्या आसपास असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कोव्हॅक्सिनची एकच लस देण्यात येणार असल्याचे तिची किंमत अधिक असल्याचे सांगण्यात येत आहे.

 
 

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top