Monday, January 18, 2021 | 04:20 PM

संपादकीय

ड्रायव्हरलेस मेट्रोचं लक्षवेधी तंत्र!

किंबहुना, असं म्हणणार्‍यांना वेड्यात काढलं गेलं असतं.

यु-ट्यूब वरुन शिकला बाईक चोरीचे धडे
पुणे
01-Jan-2021 04:42 PM

पुणे

 । पिंपरी । वृत्तसंस्था । 

यु-ट्युबवरुन दुचाकी चोरीचे धडे घेऊन अवघ्या 25 सेंकदात महागड्या दुचाकी चोरणार्‍या चोराला भोसरी पोलिसांनी जेरबंद केले आहे. विशेष म्हणजे या प्रकारात अल्पवयीन मुलगाच मुख्य सुत्रधार असल्याचं समोर आलं आहे. तो सध्या 12 मध्ये शिकत असून त्याच्या नावावर घरफोडीसह, दुचाकी चोरीचे 14 गुन्हे दाखल असल्याचं समोर आलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटकेत असलेला अल्पवयीन मुलगा 12 वी मध्ये शिक्षण घेत आहे. मात्र तिथेही चोर्‍या करत असल्याचं त्याच्या आईच्या लक्षात आलं आणि तिने पुण्यात नातेवाईकांच्या ओळखीने स्थानिक महिविद्यालयात शिक्षणासाठी पाठवलं. अल्पवीयन आरोपीकडे 18 महागड्या दुचाकी पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत. दोन्ही आरोपींनी यु-ट्युब वर बाईक चोरी करण्याचे व्हिडीओ पाहत चोरी करायला सुरुवात केल्याची माहिती तपासाअंती समोर आली आहे.

 

संबंधित बातम्या

Previous Next
Go To Top